बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील वीरशैव लिंगायत तेली तरुण मंडळाने आयोजित केलेल्‍या राज्‍यव्‍यापी वधू-वर पालक परिचय मेळाव्‍यात 198 उपवर मुला-मुलींनी सहभाग नोंदविला तर सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्‍यांचा विवाह मोठ्या थाटात लावण्‍यात आला.
    दुष्‍काळी परिस्थितीत विवाहातील अनावश्‍यक खर्च टाळून देखील मोठ्या थाटात विवाह सोहळ्याचे आयोजन केल्‍याने तेली समाज बांधवांमध्‍ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. समाज अल्‍पसंख्‍याक असल्‍याने व संपूर्ण महाराष्‍ट्रभर विखुरला गेल्‍याने सामुदायिक विवाह सोहळा व वधू-वर परिचय मेळाव्‍याच्‍या निमित्‍ताने बार्शी शहरात एकत्रितपणे येण्‍याचा योग जूळवून आला.
    या विवाह सोहळ्यात वधू-वरांना आशिर्वाद देण्‍यासाठी श्री.ष.ब्र. 108 सिध्‍देश्‍वरलिंग शिवाचार्य गडगेकर महाराज, आमदार दिलीप सोपल, अखिल महाराष्‍ट्र लिंगायत तेली समाजाचे अध्‍यक्ष वसंतराव सांगवडेकर, लातूर महानगरपालिकेचे नगरसेवक दत्‍तात्रय लोखंडे, कुर्डूवाडी येथील उद्योजक जयकुमार भिसे, मंगळवेढ्याचे माजी नगराध्‍यक्ष शिवदास चिंचकर, वीरशैव समाजसेवा संस्‍थेचे अध्‍यक्ष बाबासाहेब कथले व राज्‍यभरातील विविध मान्‍यवर उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी अध्‍यक्ष राजाभाऊ कचरे, नागजी नान्‍नजकर, भिमराव कोरे, बाळासाहेब गाताडे, बंडू बागल, भिमराव कोरे, बबन लोखंडे, पिंटू कचरे, विनोद इंगळे, सोमनाथ सेवकर, भारत कोरे, गणेश बागल, दत्‍ता सातारकर, महेश देशमाने, अनंत देशमाने, अनंत देशमाने, गणेश गाताडे, योगेश गाताडे, भगवान क्षिरसागर, अशोक नान्‍नजकर, नाना नान्‍नजकर, दत्‍तात्रय चाबुकस्‍वार, राजेंद्र म्‍हेत्रे, सोमेश्‍वर देशमाने, दत्‍तात्रय देशमाने, शाम दळवे व युवा ग्रुपचे कार्यकर्त्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.
    जिल्‍हा दूश संघामार्फत व-हाडी मंडळीसाठी थंड पाण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली. मार्केट कमिटी, नगरपरिषद यांच्‍यावतीने विशेष सहकार्य करण्‍यात आले.
 
Top