उस्मानाबाद :- जिल्हा  निवड समिती, उस्मानाबाद अंतर्गत बांधकाम विभाग जिल्हा परीषद, उस्मानाबादअंतर्गत कनिष्ठ आरेखक व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. विहीत दिनाकांस प्राप्त अर्जाची पडताळणी  करुन पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या नोटीस बोर्डावर तसेच उसमानाबाद एनआयसी (OsmanabadNIC) या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे. या यादीबाबत कोणाचे कांही आक्षेप असल्यास त्या पुराव्यासह शनिवार, दि. 18 मे पर्यंत बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांचेकडे सादर करावेत, असे आवाहन सचिव तथा कार्यकारी अभियंता (बांधकाम) जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top