उस्मानाबाद -: पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद, पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे पोलीस भरती प्रक्रिया चालू असल्याने भरतीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी दि. 22 मेच्या मध्यरात्रीपर्यंत या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी कळविले आहे.
या आदेशानुसार पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, उस्मानाबाद या 100 मीटर परिसरात घोषणा देण्यास, परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय उमेदवारास मोबाईल, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलीस भरतीसाठीचे उमेदवारांशिवाय इतर व्यक्तिंना पेालीस कवायत मैदान, उस्मानाबाद येथे प्रवेश नसेल. केवळ पोलीस भरतीसाठी नेमणूक केलेले अधिकारी, कर्मचारी, पोलीस बंदोबस्ताचे अधिकारी, कर्मचारी यानाच उक्त परिसरात प्रवेश राहील. इतरांना (उमेदवारांच्या नातेवाईकांसह प्रवेश असणार नाही.)
उक्त ठिकाणाचे 100 मीटर आवारात उमेदवार वगळून इतर 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. हे आदेश दि. 22 मे, च्या रात्री मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहेत. याची संबधितांनी नोंद घ्यावी,असेही कळविण्यात आले आहे.