उस्मानाबाद :- अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र या दोन्ही व्यावसायीक अभ्यासक्रमांसाठी एकच सामाईक प्रवेश परीक्षा गुरुवार दि.16 मे रोजी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्याचे ठरविण्यात आले आहे. या प्रवेश परीक्षेसाठी उस्मानाबाद जिल्हयातून 2520 विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षेसाठी उमेदवारांनी सकाळी 9-15 वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहावे, असे आवाहन जिल्हा संपर्क अधिकारी टी. एस. पवार यांनी केले आहे.
शैक्षणिक वर्ष 2013-14 या वर्षासाठी अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र या दोन्ही अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्हयातील 4 शाळा/ महाविद्यालये परीक्षा केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयातून प्रवेश परीक्षेची ॲडमीट कार्ड प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. महाराष्ट्राबाहेरील जे विद्यार्थी परिक्षेस बसले आहेत त्यांना त्यांनी अर्जात सादर केलेल्या नोटीफाईड कॉलेज अधिकाऱ्यांच्या कार्यालयातुन अँडमिट कार्ड उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांची अँडमिट कार्ड परीक्षेपुर्वी मिळाली नसेल, किंवा गहाळ झाले असेल त्यांनी डुप्लीकेट अँडमिट कार्ड प्राप्त करुन घेण्यासाठी संबंधित जिल्हयाच्या निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
गतवर्षीप्रमाणे अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित व औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र आणि गणित / बायोलॉजी या विषयाची परिक्षा देणे गरजेचे आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही अभ्यासक्रमाच्या परीक्षांना बसू देण्याची व्यवस्था करण्यात आली त्यासाठी खालीलप्रामणे परीक्षा केंद्राचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
फक्त अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित , एम. एम. प्रकारचे केंद्र. 2. औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी भौतीकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित बायोलॉजी-एम. बी. प्रकारचे केंद्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि बायोलॉजी-बी-बी-प्रकारचे केंद्र.
प्रत्येक परीक्षा केंद्रावर 144 कलम दि. 16 मे रोजी सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत लागू करण्यात आले असून या कलानुसार दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तिंच्या जमावाला परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात प्रतिबंध करण्यात आला आहे.
तसेच उपरोक्त कालावधीत परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात झेरॉक्स यंत्र, इंटरनेट सुविधा व दुध्वनी केंद्रे बंद करण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्रात परीक्षार्थी विद्यार्थ्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस प्रवेश देण्यात येणार नाही. किंवा परीक्षा संपेपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यास केंद्र सोडून बाहेर जाता येणार नाही. केंद्रात परिक्षार्थी मोबाईल फोन, पेजर, लॅपटॉप, कॅलक्युलेटर इ. नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना फक्त काळे बॉलपॉइट पेन, अँडमिट कार्ड, रिसिप्ट-कम-आयडेंटीटीकार्ड नेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून लाँग टेबल प्रश्न पत्रिकेसोबत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
एमटी-सीईटी-2013 या प्रवेश परीक्षेचा निकाल दि. 5 जुनपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. या प्रवेश परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत करण्यात येणार आहे. सदर प्रवेश परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे व त्यानुसार तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रेफरन्स फॉर्म भरुन त्यांची अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येईल, असे जिल्हा संपर्क अधिकारी पवार यांनी कळविले आहे.