उस्मानाबाद :- शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या धान्य महोत्सवास आज प्रारंभ झाला. राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास  व मत्स्य व्यवसायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण, खा.पद्मसिंह पाटील यांनी या महोत्सवाचे उदघाटन केले.
      येथील परिमल मंगल कार्यालय येथे हा धान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आठही तालुक्यातील शेतकरी, शेतकरी गट, महिला बचतगट आदिंनी आपली उत्पादने या महोत्सवात मांडली आहेत.
       ज्वारी, विविध प्रकारच्या डाळी, सेंद्रीय गुळ, सेंद्रीय आंबा,डाळींब आदि विविध कृषी मालाबरोबरच कृषी अवजारे, कृषीसाठी लागणारे बियाणे याठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.
     पालकमंत्री ना. चव्हाण,खा.डॉ. पाटील यांच्यासह जि.प.उपाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर, जिल्हाधिकारी डॉ.के.एम. नागरगोजे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत हजारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, कृषी विकास अधिकारी मदनलाल मिनीयार, आठही तालुक्यांचे तालुका कृषी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
    उदघाटनानंतर पालकमंत्री चव्हाण आणि डॉ. पाटील यांनी भाषणाएैवजी प्रत्येक स्टॉलला भेट देवून पाहणी केली व विक्रीसाठी आणण्यात आलेल्या उत्पादनाची माहिती घेतली.
           हा धान्य महोत्सव 16 मे पर्यंत सुरु राहणार असून ग्राहकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन तोटावार यांनी केले आहे.
 
Top