नवी दिल्‍ली -: यंदाच्‍या मोसमातल्‍या पावसाच्‍या पहिल्‍या सरी येत्‍या दि. 3 जूनला केरळमध्‍ये बरसतील, असा अंदाज हवामान खात्‍याने वर्तविला आहे. अंदमान बेटावर दि. 17 मे रोजी पावसाचे आगमन झाले होते. नेहमीपेक्षा तीन दिवस आधीच मान्‍सून अंदमानात दाखल झाला होता. सारे काळी सुरळीत राहिल्‍यास येत्‍या दि. 7 जून पर्यंत मान्‍सून महाराष्‍ट्रासह पश्चिम भारतात सक्रिय होईल, अशी हवामान खात्‍याला आशा आहे.
    हवामान खात्‍याने मागील महिन्‍यात वर्तविलेल्‍या अंदाजात यंदा सरासरी 98 टक्‍के पाऊस होईल, असे म्‍हटले होते. गतवर्षी महाराष्‍ट्रासह चार राज्‍यांमधील भीषण दुष्‍काळामुळे जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. आजही अनेक गावांमध्‍ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. समाधानकारक पाऊस झाला तरच पिण्‍याच्‍या पाण्‍याची समस्‍या वर्षभरापुरती सुटेल, अशी आशा दुष्‍काळग्रस्‍त बाळगून आहेत. पुढील तीन दिवसांमध्‍ये बंगालाच्‍या उपसागरात मान्‍सूनचे वारे पोहोचतील. त्‍यावरुनच 3 जून रोजी केरळमध्‍ये मान्‍सून पोहोचण्‍याची शक्‍यता आहे.
 
Top