उस्मानाबाद -: पत्रकारांचे अडीअडचणी सोडविण्यासाठी लवकरच तालुकास्तरावरील कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पत्रकार बांधवांच्या हितांचे अनेक विविध योजना राबविणार असल्याची प्रतिक्रिया उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष संतोष जाधव यांनी बोलताना दिले.
जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात नूतन पदाधिका-यांना निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब भन्साळी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार कोकाटे यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना जाधव पुढे म्हणाले की, पत्रकार संघाच्या इमारतीचे बांधकाम करणे, सभागृहात ग्रंथालय सुरु करणे, विमा योजना पूर्ववत सुरु ठेवणे, ही सर्व कामे करीत सर्व पत्रकार मित्रांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी भाऊसाहेब भन्साळी, सचिव राजाभाऊ वैद्य, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, पत्रकार प्रभाकर लोंढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत कदम, प्रमोद कांबळे, सहसचिव प्रशांत कावरे, प्रांतिक प्रतिनिधी विजय मुंडे, कळंब तालुकाध्यक्ष पार्श्वनाथ बाळापुरे, अंबादास पोफळे (तुळजापूर), सुरेशकुमार घाडगे (परंडा), इकबाल मुल्ला (लोहारा) यांच्यासह प्रवीण पवार, महादेव नरुटे, प्रवीण कसबे, अमोल गाडे, सुभाष कदम, अजिंक्य माने, सचिन मोरे, मल्लिकार्जून सोनवणे, उमाजी गायकवाड, ज्ञानेश्वर पतंगे, अमर चोंदे, अमजद सय्यद, सचिन व्हनससाळे, दत्ता शिंदे, अनंत साखरे यांच्यासह पत्रकार संघाचे सदस्य, नागरीक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्य यांनी तर उपेंद्र कटके यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी अध्यक्ष संतोष जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.