बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: शिवसेनेने पूर्वीपासून सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवला आहे, आणीबाणी होती त्यावेळी शिवसेनाप्रमुखांच्या आदेशानुसार मुंबईमध्ये स्मगलिंग बंद केली. मटका बंदी, दारु बंदी करुन आंदोलने केली. आंधळकर यांच्या पोलिसी कारकिर्दीची वृतपत्राची कात्रणे पाहून त्या पूर्वीच्या गोष्टी व शिवसेनेचा भूतकाळ आठवल्याचे शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांनी सांगितले.
शिवसेना पक्षमुख उध्दव ठाकरे हे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर परंडा (जि. उस्मानाबाद) येथे दि. 11 मे रोजी सायंकाळी पाच वाजता व सोलापूर येथे दि. 12 मे रोजी जाहीर सभेत मार्गदर्शन करणार आहेत. यानिमित्त नियोजन करण्यासाठी बुधवार दि. 8 मे रोजी सौंदरे (ता. बार्शी) येथील हॉटेल राजमुद्रा येथे नेरुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील व बार्शी तालुक्यातील पदाधिका-यांची बैठक बोलविण्यात आली होती.
यावेळी उपनेते विश्वनाथ नेरुरकर, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, जिल्हा उपप्रमुख तात्या भँवर, भाऊसाहेब आंधळकर, सौ.सीमाताई आंधळकर, महिला तालुकाप्रमुख मंगलताई पाटील, बाबासाहेब कापसे, महिला शहरप्रमुख मनिषाताई नान्नजकर, तालुकाप्रमख काकासाहेब गायकवाड, दिपक आंधळकर, विराज विभुते, तालुका उपप्रमुख राजेंद्र देशमुख, शिवाजी सुरवसे, संतोष काटे, धिरज पाटील, विलास लाडे, अविनाश शिंदे, राजाभाऊ जगताप, वैराग शहरप्रमुख संतोष गणेचारी, संभाजी आगलावे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना नेरुरकर म्हणाले, शनिवार दि. 11 मे च्या परंडा येथील सभेनंतर दि. 12 मे रोजी सोलापूर येथे सकाळी नियोजित वेळेवरच आठ वाजता सभा होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्या नियोजित वेळेच्या अगोदर उपस्थित राहिल्यास उन्हाचा त्रास होणार नाही व त्यांचा पुढील नियोजित दौरा वेळेवर होणार असल्याने त्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
दुष्काळाची परिस्थिती गंभीर असताना शिवसेना सोडून एकाही पक्षाच्यावतीने खिशात हात घालून शेतकरी व जनतेच्या प्रश्नासाठी काम केले नाही. आपला शिवसैनिक प्रत्येक गावात, वाड्या वस्त्यात जाऊन लोकांच्या प्रश्नांचा आढावा घेतो व त्यांच्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना आखत आहे. परंतु त्या जिल्ह्याचे खासदार झालेले सुशिलकुमार शिंदे काय करतात अन् शरद पवार तर आपल्या जिल्ह्यातील शेतक-यांचे पाणी पघ्ळवून बारामतीच्या शेतीला 24 तास पुरवठा करीत आहे. त्यांच्याकडे वीजदेखील 24 तास उपलब्ध आहे. अन् इकडचा शेतकरी पाण्याच्या थेंबासाठी तडफडत आहे. यापुढे जनतेची कामे करणारा पक्ष देखील शिवसेना असले आणि निवडणुकीत मताधिक्य मिळविणारा पक्ष देखील केवळ शिवसेनाच असेल, असेही त्यांनी शेवटी सांगितले.