उस्मानाबाद :- जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ अधिका-यांना जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दि. 18 मे ते 1 जून 2013 या कालावधीत नियमनात्मक अधिकार बहाल केले आहेत.
          परंडा येथे 18 ते 23 मे या कालावधीत साजरा होणारा ख्वाजा बद्रोद्दीन चिस्ती दर्गा उर्स आणि दि. 23 मे ते 1 जून या कालावधीत साजरा होणारा उस्मानाबाद येथील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी रहे दर्गा उर्स या पार्श्वभूमीवर यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार ते अधिकारी मिरवणूकीला अथवा जमावाला आवश्यक ते निर्देश देवू शकतील  व त्याचे पालन करणे बंधनकारक असेल.
 
Top