उस्मानाबाद -: शेतक-यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी कृषी व पणन विभागाच्या वतीने 14 ते 16 मे या कालावधीत परिमल मंगल कार्यालय, उस्मानाबाद येथे सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उस्मानाबाद तालुक्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी या महोत्सवात भाग घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी एस.पी. जाधव यांनी केले आहे. उस्मानाबाद तालुक्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथील कृषी कार्यालयात धान्य महोत्सव कक्ष स्थापन झाला असून त्यासाठी बी. व्ही. माळी (मो.क्र. ९४२२०६९३९०) आणि ए. पी. चिक्षे (९४२२०७०७६७) यांची संपर्क प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 
 
Top