उस्मानाबाद :- उस्मानाबाद शहरासाठी उजनी उद्भव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली आहे. मात्र, अद्यापही अंतर्गत वितरण व्यवस्थेचे काम अद्यापही अपूर्ण असल्याचे निदर्शनास येत आहे. या योजनेचे पाणी शहरामध्ये समान पद्धतीने वाटप करण्यासाठी वितरण व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रीत करावे आणि अनधिकृत नळ जोडण्या खंडीत करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे यांनी उस्मानाबाद नगरपालिकेला दिले आहेत.
यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी नगरपालिकच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. यात त्यांनी नवीन पाणी योजनेचा पाणीपुरवठा शहरामध्ये समान पद्धतीने होत नसल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात अंतर्गत वितरण व्यवस्थेचे काम करुन घेण्यासाठी पाठपुरावा करावा, समान पद्धतीने पाणीवाटप करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, अंतर्गत व्यवस्थेतील दोष दूर करण्यासाठी तांत्रिक सल्लागारांची मदत घ्यावी, अनधिकृत नळ जोडण्या खंडित कराव्यात, शहरातील सर्व झोनमध्ये समान पद्धतीने पाणी वितरित होईल, हे पाहावे, असे निर्देश दिले आहेत.