बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील रोहन क्‍लब हाऊसच्‍या माध्‍यमातून अलीपूर रोड येथील 22 बंगले परिसरातील अनिल मुंढे यांनी छोट्या स्विमिंग टँकच्‍या माध्‍यमातून बार्शीकरांच्‍या अनेक वर्षापासूनच्‍या स्विमिंगच्‍या इच्‍छेची पूर्तता केली आहे.
    सर्वच लहान मुलांना आवश्‍यक असलेल्‍या पोहण्‍याची कला आत्‍मसात करणे अथवा आपत्‍कालिन परिस्थित आपला जीव वाचविता येणे आवश्‍यक असते. दुष्‍काळाच्‍या सद्यपरिस्थितीत अनेक विहिरींना पाणी नसल्‍याने पोहण्‍याच्‍या आनंदापासून अनेकांना मुकावे लागले. एकदम विहिरीमध्‍ये पोहण्‍याचे धाडस अनेक मुलांमध्‍ये नसते, त्‍याकरीता अशा प्रकारच्‍या स्‍वच्‍छ पाण्‍यात व ज्‍याठिकाणी छोट्या जीवांना कसल्‍याही प्रकारचा धोका नसतो व मुलांमध्‍ये आत्‍मविश्‍वास लवकर निर्माण होऊन पोहता येते, अशा स्विमींग टूंकची नितांत गरजच होती. चांगल्‍या सुसज्‍ज स्विमींग टँकसाठी मोठा खर्च येत असल्‍याने शासकीय योजनेतून स्विमींग टँकची सुविधा निर्माण करणे बार्शीसारख्‍या शहराची आवश्‍यकता आहे. अनेक वर्षापासूनची इच्‍छा असूनही बार्शीसारख्‍या शहरात अशा प्रकारची गरज होती, परंतु नेमके कोणी करायचे व कोणासाठी या प्रश्‍नात अनेकजण अडकल्‍याने सुविधा निर्माण होऊ शकली नाही. अनिल मुंढे यांची तीव्र इच्‍छा असल्‍याने अनेक ठिकाणहून माहिती गोळा केली व ती सुविधा अत्‍यंत कमी जागेतदेखील कशाप्रकारे पूर्ण करता येते, याचा अभ्‍यास केला. स्‍वतःच्‍या बंगल्‍यातील काही जागेत सदरच्‍या टाकीचे नियोजन करुन स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी स्‍वतंत्र, स्‍वच्‍छतागृह, स्‍नानगृह, सोबतच्‍या साहित्‍यासाठी जागा, जाकोजी एअर पॉईन्‍ट मसाज, लहान मुलांसाठी कमी उंचीचे व मोठ्यांसाठी जादा उंचीचे लगतचे टँक, पाणी स्‍वच्‍छ करण्‍यासाठीची उपकरणे, कारंजे, धबधबे, आकर्षक विद्युत रोषणाई, पाणी शुध्‍दीकरणाच्‍या केमिकल्‍स इत्‍यादी सोयींनी युक्‍त अशा टँकची उपलब्‍धता केली.
 
Top