बंगळुरु :- कर्नाटकमध्ये सत्ता परिवर्तनाचे स्पष्ट संकेत मिळाले आहे. सर्व जागांचे निकल अद्याप जाहीर झालेले नसले तरीही कॉंग्रेसने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरु केली आहे. काही धक्कादायक निकाल लागले आहेत. माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांना पराभवाचा धक्का बसला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला फटका बसल्याचे चित्र आहे. भाजपची स्थिती अतिशय बिकट झाली असून विरोधी पक्षनेतेपदही भाजपला मिळणार नाही. याउलट जेडीएसने जोरदार मुसंडी मारली. दुसरा मोठा पक्ष म्हणून जेडीएसने स्थान मिळविले आहे. आपण विरोधी बाकांवर बसणार असल्याचे पक्षाचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी स्पष्ट केले आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे दोन आमदार निवडून गेले आहेत. संभाजी पाटील आणि अरविंद पाटील यांचा विजय झाला आहे.
भाजप सध्या 34 जागांवर आघाडीवर असून कॉंग्रेस 117 जागांवर पुढे आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या केजीपीला 13 ठिकाणी आघाडी आहे. स्वतः येडीयुरप्पा यांना शिकारपुरा मतदारसंघातून आघाडी मिळाली आहे. याशिवाय इतर ठिकाणी केजीपीचा प्रभाव दिसून आलेला नाही. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मात्र येडीयुरप्पांचा फटका बसलेला दिसत आहे. परंतु, त्यांच्या पक्षाला जास्त जागांवर आघाडी नाही. जेडीएसला 43 ठिकाणी आघाडी आहे. जेडीएसने अनपेक्षितरित्या आघाडी घेतली आहे. अर्थात हा भाजपलाच बसलेला फटका आहे. जेडीएस राज्यात दुसरा मोठा पक्ष म्हणून समोर येण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसला पूर्ण बहुमत न मिळाल्यास जेडीएसची कॉंग्रेसला मदत मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय येडीयुरप्पा यांनीही सर्व पर्याय खुले असल्याचे स्पष्ट केले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप नेते नरेंद्र मोदी यांची किमया दिसली नाही. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनाही फारसे यश मिळालेले नाही. कॉंग्रेसला जरी बहुमतापर्यंत मजल मारता येत असल्याचे चित्र असले तरीही त्यात राहुल गांधींचा प्रभाव कमी आहे. भाजपचा अंतर्गत कलह आणि सरकारविरोधी लाटेमुळे कॉंग्रेसला फायदा झाल्याचे स्पष्ट होत आहे. माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. कॉंग्रेसच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला. यावरुन भाजपची स्थिती स्पष्ट होत आहे.
संभाव्य विजयाचे संकेत मिळताच कर्नाटकमध्ये काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे.
आघाडी
भाजप - 34
कॉंग्रेस - 117
जेडीएस - 43
केजीपी - 13
इतर- 13

महाराष्ट्र एकीकरण समितीचे दोन आमदार
बेळगाव आणि सीमेलगतच्या मराठी भाषिक भागात महाराष्ट्र एकीकरण समितीने दोन विजय मिळविले आहेत. संभाजी पाटील यांचा विजय झाला आहे. तर अरविंद पाटील यांनीही विजय मिळविला आहे. मनोहर किणीकर यांना मात्र अवघ्या 500 मतांनी पराभव पत्कारावा लागला आहे. .
संभाजी पाटील बेळगाव दक्षिणमधून उभे होते. बेळगाव ग्रामिणमध्ये किणीकर उभे होते. तर खानापूर येथून अरविंद पाटील यांनी निवडणूक लढविली. खानापूर हा एकीकरण समितीचा बालेकिल्ला आहे. गेल्यावर्षी एकीकरण समितीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. यावेळी एकी झाल्यामुळे एकीकरण समितीला यश मिळाले आहे.

(* साभार : दिव्यमराठी)