बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या दिल्ली मुख्यालयाच्यावतीने देण्यात येणा-या सर्वोत्कृष्ट सेवा कार्य पुरस्काराचे वितरण झाले असून यंदा बार्शीतील सामाजिक कार्यकर्ते अजित कुंकूलोळ यांना केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाबनबी आझाद यांच्या हस्ते दिल्लीतील राष्ट्रपती भवनात प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
दरवर्षी इंडियन रेडक्रॉस सोसायटी दिल्ली मुख्यालय व सेंट जॉन ॲम्बुलन्स इंडिया या दोन्ही आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थाच्या संयुक्त विदयमाने राष्ट्रपतीच्यावतीने विविध राज्यांना केलेल्या कार्याबददल गौरवण्यात येते. यंदा दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दि. 3 मे रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री गुलामनबी आझाद, पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, हरियाणाचे राज्यपाल जगमोहन पहाडिया, राजस्थानच्या मागरिट अल्वा, छत्तीसगढचे शेखर दत्त व क्रॉस राष्ट्रीय सचिव डॉ. एस.पी. अग्रवाल, डॉ. कमला गिडवाणी, दिपेन्द्र आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कारासाठी विविध राज्य शाखांना खालील पुरस्कार देवून सन्मानि करण्यात आले. यामध्ये निधीसंकलन व सभासद वाढ यासाठी ओडीसा व चंदीगडचा फिरती ढाल देवून तर राज्यात सर्वात जास्त ऐच्छिक रक्त संकलनासाठी देखील ओडिसाचा तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात जादा रक्तसंकलन केल्याबददल हरियाणा व दादरानगर हवेली या राज्याचा फिरते ढाल देऊन गौरव झाला. याचबरोबर ग्वाल्हेर शाखेचे सचिव डॉ. रामप्रकाश शर्मा, डॉ. वाली, डॉ. राम मनोहर लोहिया हॉस्पीटल दिल्ली, डॉ. उडडेपी कृष्णा, सदस्य मॅनेजींग व फायनान्स आयोग कर्नाटक, रामेश्वर मिश्रा सचिव पश्चिम बंगाल यांचा सुवर्णपदक देऊन राष्ट्रपतीच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. तर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री गुलामनबी आझाद यांच्या हस्ते अजित कुंकूलोळ, बार्शी (महाराष्ट्र), डॉ. परेश देसाई (गुजरात), बाळकृष्ण सिध्दुला (आंध्रप्रदेश), मोरीस शांताकृझ (तामिळनाडू), डॉ. मंगलाप्रसाद मोहं (ओडिसा), डी.आर. शर्मा (हरियाणा) यांचा गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.