नळदुर्ग -: बगदल (जि. बिदर) येथील हजर खुतबुल अखताब फरदुल गौसुल इसलाम खुबुल मजीद व फरदुल वहीद सैयद सादात हजरत सय्यद अब्‍दुल खादर शाह वली गंजे सवाई बक्ष बादशाहा नागोरी यांचा 456 वा उर्स दि. 9 ते 11 मे या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा होत आहे.
    दि. 9 मे रोजी सायंकाळी साडे पाच वाजता 'संदल शरीफ' निघून साडे आठ वाजता दर्गाह येथे पोहचणार व त्‍यानंतर रात्री दहा वाजता मुंबई, दिल्‍ली येथील प्रसिध्‍द कव्‍वालांचा कव्‍वालीचा कार्यक्रम होणार आहे. तर दि. 10 मे रोजी सकाळी दहा वाजता नियाज शरीफ हजरत गौस-उल-आजम दस्‍तगीर यांच्‍या नावे महाप्रसादाचे वाटप होणार आहे. संध्‍याकाळी नामांकित कव्‍वालांचा  कव्‍वाली स्‍पर्धा होईल. दि. 11 मे रोजी सकाळी सात वाजण्‍यापूर्वी कुराण पठाण होईल. त्‍यानंतर जियारत व महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होईल. उर्सनिमित्‍त वरील सर्व धार्मिक कार्यक्रमाचा परिसरातील भाविक भक्‍तांनी लाभ घेण्‍याचे आवाहन हजरत अलहाज मुहम्‍मद इदरीस साहाब खादरी, जावेद पटेल, मकबुल अहेमद, जिलानी कुरेशी यांनी केले आहे.
 
Top