नळदुर्ग -: ग्रामीण भागाच्‍या विकासात्‍मक दृष्‍टीकोने समोर ठेवून शासनाकडून विविध योजना राबविल्‍या जातात, त्‍या सर्व योजना गावपातळीपर्यंत पोहचविण्‍याचा प्रयत्‍न सर्वस्‍तरातून झाला पाहिजे. संगायो, इंगायो, श्रावबाळ योजना व इंदिरा आवास, रमाई आवास घरकुल योजना अशाप्रकारे असलेल्‍या शासकीय योजनेपासून ग्रामीण भागातील सामान्‍य माणूस वंचित राहू नये, यांची दक्षता कार्यकर्त्‍यांनी घ्‍यावी, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण यांनी (ता. तुळजापूर) येथे बोलताना केले.
    सध्‍यस्थितीत दुष्‍काळाचा सामना करण्‍याकरीता व पाणीटंचाईवर मात करण्‍यासाठी शासकीय पातळीवर काय उपाय योजना कराव्‍या लागतील, याकरीता जनतेच्‍या समस्‍या जाणून घेण्‍यासाठी पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाणहे दुष्‍काळी भागाची पाहणी करीत आहे. ते नुकतेच वागदरी (ता. तुळजापूर) येथे टंचाईग्रस्‍त दौ-यावर आले होते. यावेळी ते ग्रामस्‍थांना मार्गदर्शन करताना बोलत होते. पुढे बोलताना म्‍हणाले की, सध्‍या जनावरासाठी चारा, पाणी आणि मजूरांच्‍या हाताला का ह्या बाबी महत्‍त्‍वाच्‍या असून पाणी टंचाई मात करण्‍यासाठी गावपातळीवर सर्वोतोपरी प्रयत्‍न करणे गरजेचे आहे. गावतील जुन्‍या विहीरीतील गाळ काढणे, नव्‍याने हातपंप, बोअर घेऊन पाणी टंचाईचा सामना करण्‍याची तयारी ग्रामपंचायतीने ठेवावी. शासकीय पातळीवर जे काही सहकार्य लागेल ते मिळवून देण्‍याचा आपण प्रयत्‍न करु, असे आश्‍वासन यावेळी ना. चव्‍हाण यांनी दिला.
    यावेळी पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश चव्‍हाण, वागदरी ग्रामपंचायतीचे सरपंच राजकुमार पवार, उपसरपंच लक्ष्‍मी ठाकूर, सुभाष सुरवसे यांसाठी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते.
a
 
Top