बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: महाराष्‍ट्र राज्‍य शासकीय पुननियुक्‍त माजी सैनिक संघटनेच्‍या औरंगाबाद येथे झालेल्‍या चौथ्‍या राज्‍यस्‍तरीय सभेत संघटनेची पुनर्बांधणी, बळकटी व माजी सैनिकांच्‍या विविध समस्‍येबा‍बत चर्चा झाली.
    यावेळी राज्‍याध्‍यक्ष चंद्रसेन कुलथे, सचिव प्रकाश कुलकर्णी, अतिथी कमांडर बरगे तसेच राज्‍यभरातील विविध पदाधिकारी व सदस्‍य उपस्थित होते. नागरी सेवेत पदोन्‍नतीसाठी सैन्‍य सेवेचा विचार करावा, बदल्‍याबाबतचे धोरण, सैनिक कल्‍याण विभागाची पुनर्रचना, उच्‍च पदावर नियुक्‍त होण्‍यासाठी सवलती इत्‍यादी विषयावर चर्चा करण्‍यात आली.
    याप्रसंगी संस्‍था संचलित पुननियुक्‍त माजी सैनिक कल्‍याणकारी संस्‍था (महाराष्‍ट्र राज्‍य) औरंगाबाद या संस्‍थेचे उदघाटन करण्‍यात आले. माजी सैनिकांना आजीवन किंवा वार्षिक सदस्‍य होण्‍यासाठी वार्षिक वर्गणी तीनशे रुपये तसेच आजीवन सदस्‍य होण्‍यासाठी पाच हजार रुपये भरुन सदस्‍य होता येईल. सदरच्‍या नोंदणीकृत संस्‍थेच्‍या सदस्‍यांकरीता सैनिक सिटी प्रस्‍तावित करण्‍यात आली असून स्‍वस्‍त घरे उपलब्‍ध करणाचा संस्‍थेचा मानस असल्‍याची माहिती जिल्‍हाध्‍यक्ष शरद शिंदे यांनी दिली.
 
Top