बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: शासनाची फसवणूक करुन वर्षानुवर्षे वाळूचा उपसा सुरु असून वाळू माफियाविरूद्ध कारवाई करणा-यांच्या जीवावर उठत आहेत. अधूनमधून कारवाई होत असल्याने व तक्रारींचे प्रमाण वाढल्याने वाळू माफियांनी वाळूचे भाव गगनाला नेले आहेत. वरपासून खालीपर्यंत दलालांची साखळी असल्याने त्यांच्यापर्यंत कायद्याचे हात पोहोचत नसल्याने त्यांचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकवेळा राजकीय हस्तक्षेप होत असल्याने अनेकवेळा त्यांना मोकळे सोडण्यात येत आहे. फुकटच्या वाळू उपशावर वाळू माफिया कोट्यावधी रुपये गोळा करत आहेत तर अनेकांची बांधकामाची गरज असल्याने गरजूवंत डोळे झाकून पैसे मोजत आहेत.
कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वतः मंगळवारी दि. 30 एप्रिल रोजी रात्री सव्वा नऊ वाजता यातील आरोपींना चार ट्रकमधून वाळूची तस्करी करताना रंगेहाथ पकडले होते. यात एम.एच. 45 / 6555, एम.एच. 11 ए.सी. 7176, एम.एच 13 एएक्स 2113, एम.एच. 13 ईएफ 0217 हे चार टृक होते. मिडी (ता. मोहोळ) येथील बेगमपूर वाळूचा उपसा करुन अविराज इंडिकेम प्रा.लि. साठा क्रमांक सहा मधून वाळू घेऊन परवान्यापेक्षा जास्त वाळू चोरी करुन पावत्यांमध्ये खाडाखोड केल्याचे, बनावट दस्ताऐवज तयार केल्याचा गुन्हा उघड झाला आहे. भारतीय पर्यावरण कायदा क्र. 9 व 15 नुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली व आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरच्या प्रकारामुळे बार्शी तहसिलमध्ये सावळागोंधळ होत असल्याचे लक्षात आल्याने प्रभारी तहसिलदार सांगडे यांच्यावर विसंबून बार्शी शहराचा कारभार ठेवणे योग्य नसल्याने नूतन तहसिलदार सोमवंशी यांची तात्काळ नेमणूक करण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी लक्ष घातल्यापासून बार्शीत वाळू माफियांविरूद्ध मोहिम आखण्यात आली आहे.
दि. 6 मे रोजी बाळेश्वर नाका येथे एम.एच. 12 एचडी 1215 या वाहनात चार ब्रास वाळू घेऊन जाणारा चालक भारत ठोंगे (रा. हिंगणगाव, ता. परंडा) यास अटक करण्यात आली. तसेच एम.एच 12 ईझेड 8858 या वाहनात चार ब्रास वाळू घेऊन जात असलेला चालक गजेंद्र उकीरडे याला अटक करण्यात आली.
दि. 7 मे रोजी एम.एच. 42 बी 8029 या वाहनात तीन ब्रास वाळू धेऊन जात असलेला चालक मारुती लोकरे (रा. पानगाव, ता. बार्शी) यास अटक करण्यात आली.
दि. 18 मे रोजी एम.एच. 45 / 1080 या वाहनात चार ब्रास वाळू घेऊन जात असलेला चालक लक्ष्मण कदम (रा. उपळाई खुर्द, ता. माढा) हा वाहतूक परवान्यामध्ये खाडाखोड करुन विल्हेवाट लावताना रंगेहाथ सापडला, त्याला अटक करण्यात आली आहे.
दि. 19 मे रोजी एम.एच. 12 एचडी 2373 या वाहनात तीन ब्रास वाळू घेऊन जात असलेला चालक महारुद्र टोंपे (रा. परंडा, जि. उस्मानाबाद) हा वाहतूक परवान्यामध्ये खाडाखोड करुन विल्हेवाट लावताना रंगेहाथ सापडला, त्याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, दि. 18 मे रोजी दुपारी चारपासून बार्शी पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या तहसिलच्या कर्मचा-याना राजकीय नेत्यांचे जसजसे फोन येत होते, तसतसे तक्रार देण्यापासून काढता पाय घेत घेतला. सदरच्या बेकायदा वाळू माफियाला सोडून देण्यासाठी काही मध्यस्तांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. काहींनी तहसिल कर्मचा-याला कोप-यात नेऊन कानात काहीतरी फायदयाच्या गोष्टी सांगितल्या. सदरचा प्रकार दुपारी चार पासून रात्री साडे अकरा पर्यंत सुरुच राहिला. त्यानंतर सदरच्या आरोपीला व जप्त केलेल्या वाळू साठ्यावर कोणतीही कारवाई न करता सोडून द्यावे, असे कर्मचारी राऊत यांनी सांगितल्यावर पोलिस निरीक्षक एस.आय. चाऊस यांनी त्यांना कायदेशीर भाषेत समज दिली. तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाण नसेल अथवा तुम्ही तुमच्या नोकरीशी इमानी नसला तरी आम्हाला आमचे कर्तव्य महत्त्वाचे वाटते, असे अप्रत्यक्ष सांगून त्याच्यावर कायदयाने कारवाई केली जाईल व न्यायालयासमोर हजर करण्यात येई, असे सांगत अखेर त्या चालक व मालकांच्या विरूद्ध बार्शी पोलिसांत गुन्हा नोंद झाला.