लोहा -: पळशी (ता. लोहा) येथील तरुण व तरुणीचे प्रेमप्रकरण (लव्ह मॅरेज) गावात चांगलेच गाजले. दोघांनीही लग्न करण्याचे ठरवले. पण गावातील दोन गटात सुरू झाले राजकारण. मुलगी गरीब.. मुलगा श्रीमंत. प्रकरणाची कुणकुण लागताच गावात तणाव निर्माण झाला. याची खबर सोनखेड पोलिसांना देण्यात आली. पोलीसांनीही घटनास्थळी पोहोचत मुला-मुलीला उचलत त्यांची मते जाणून घेतली. लग्न करण्याचा त्यांचा पक्का निर्धार पाहता मग पोलिसांनीच मध्यस्थी करत १८ मे च्या मध्यरात्रीच पोलीस ठाण्यात त्यांचे शूभमंगल उरकले.
लोहा तालुक्यातील पळशी येथील सुनील नामक मुलाचे त्याच्याच नात्यातील युवतीवर प्रेम होते. तिचाही त्याला होकार होता. मात्र त्यांच्या प्रकरणाची खबर उभयंतांच्या कुटुंबियांना लागली होती. गावभरही त्याची चर्चा झाली. त्यामुळे या मुद्यावरून दोन गट समोरासमोर आले व राजकारण सुरू झाले. याची वाच्यता गावभर झाली. यात गावातील दोन गटाने सुरू केले राजकारण. दोघांच्याही आई-वडिलांना फूस लावण्यात आली. मुलगी गरीब कुटुंबातली तर मुलगा चांगल्या कुटुंबातला असे म्हणून दोघांच्याही घरच्यांना फितविण्यात आले.
अशातच मुलीचा बाप मुलाच्या आई-वडिलांकडे आपली मुलगी पदरात घेण्याची विनंती करण्यासाठी गेला. त्यावर मुलाकडील नातेवाईक चांगलेच संतप्त झाले तर राजकारण्यांनी तेल ओतण्याचे काम केले. दोन्ही कुटुंबात तणाव निर्माण झाला. अशातच पोलीस पाटील बालाजी कोलते यांनी सोनखेड पोलिसांना या घटनाक्रमाची माहिती दिली. पोलीस गावात पोहचले. सुनील व मुद्रिकाला उचलले.. ठाण्यात आणले. दोघानांही एकातांत बसवून सोनखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्रसिंघ धुन्ने यांनी विश्वासात घेत त्यांचे म्हणणे ऐकले. मुलगा थोडा ओव्हर अँक्टींग करीत असल्याचे दिसताच त्याला कायद्याच्या भाषेत विचारण्यात आले. तेव्हा तो राजी झाला 'दुल्हा-दुल्हन राजी तो क्या करेगा काजी' या म्हणीप्रमाणे दोघांच्याही आई-वडिलांना लग्न सोहळ्यासाठी राजी करण्यात आले. पण गावातील राजकारणी एक गट तयार होईना. यातच सोनखेड पोलिसांनी त्या गटाला समजावले अन् दोघांचेही शुभमंगल करण्याचे ठरले. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक धुन्ने यांनी ही घटना वरिष्ठांच्या कानी घातली. त्यानंतर शनिवारच्या मध्यरात्रीच लग्न ठाण्यातच होणार असे पोलिसांनी बजावले व अक्षता.. हारतुरे.. अंगावरचे कपडे, लग्न लावणारा.. बाशिंग.. अशी सर्व तयारी करीत मध्यरात्रीच सावधान सावधान म्हणत त्या प्रेमी युगलाचा विवाह उरकरण्यात आला.

या लग्न सोहळ्यासाठी पोलीस हेडकॉन्स्टेबल हेमंत देशपांडे, सय्यद बशीर, सलीम बेग, नसरत शेख, पाटील, फरहान खान आदींनीसह अनेक पोलिसांनी वर्हाडीची भूमिका निभावली.
(* साभार : दै. पुण्यनगरी)
(* साभार : दै. पुण्यनगरी)