येरमाळा -: अध्यात्मात मोठी ताकद आहे, याची प्रचिती वेळोवेळी, जागोजागी येते. याच अध्यात्माच्या संगतीने बोरगाव धनेश्वरी (ता. कळंब) येथील एक मुस्लिम तरुण कीर्तनकार बनला आहे. लहानपणी हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून घडलेले हे मोठे परिवर्तन असून, या मुस्लिम कीर्तनकाराने गेल्या सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून विविध गावांमध्ये कीर्तनसेवा बजावली आहे.
बोरगाव येथे पुरातनकालीन महादेव मंदिर आहे. या ठिकाणी पूर्वी मोठी यात्रा भरत असे. परंतु, कालांतराने यात्रेबरोबरच येथे होणारा हरिनाम सप्ताहदेखील बंद झाला. त्याचदरम्यान गावातील कल्याणराव सांगळे हे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून गावात परतले. त्यांना अध्यात्माची आवड असल्याने ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी बंद पडलेला हरिनाम सप्ताह व यात्रा पुन्हा सुरू केली. रामचंद्र सांगळे यांच्या सहकार्यातून सन 2000 साली विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर सभामंडपासह उभा केले व दरवर्षी या ठिकाणी हरिनाम सप्ताहास प्रारंभ केला. याच सप्ताहाच्या माध्यमातून गावातील दोन तरुणांच्या जीवनात परिवर्तन घडले. यातीलच बाबा शहाबुद्दीन शेख (30) हे कीर्तनकार म्हणून समोर आले. बाबा शेख यांना लहानपणापासूनच सप्ताहाद्वारे अध्यात्माची गोडी लागली. ते पदवीधर असून, सध्या त्यांचा पनवेल, मुंबई येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या घरात वडिलांनाही भजन, कीर्तनाची आवड होती. यातूनच बाबा शेख यांनाही आवड जडली. त्यांनी 2004 साली कल्याण (मुंबई) येथील मधुकर नाईक महाराज यांच्याकडून अनुग्रह घेतला. तत्पूर्वी दहा वर्षांपासून बाबा शेख हरिनाम सप्ताह, वारकरी सांप्रदायात रमत होते. 2006 पासून त्यांनी गावोगावी आयोजित होणार्या हरिनाम सप्ताहात कीर्तनसेवा सुरू केली. त्यांच्या कीर्तनसेवेतील बोरोटी (ता. कळंब) येथील कार्यक्रम सर्वात मोठा ठरला. एक मुस्लिम तरुण आपल्या कीर्तनसेवेद्वारे वारकरी सांप्रदाय व अध्यात्माचे महत्व विषद करताना पाहणे उपस्थितांसाठी औत्सुक्याचा विषय असतो. बालपणी हरिनाम सप्ताहातून मिळालेल्या अध्यात्मिक संस्काराने एकाच गावातील दोन तरुणांमध्ये परिवर्तन घडून त्यांनी राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी कीर्तनाद्वारे प्रबोधन सुरू केले.

* सौजन्य : दिव्यमराठी