मुरुम : खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी अचलेर (ता. लोहारा) गावास भेट देऊन तेथील पाणीटंचाईचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्थानिक अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत दुष्काळी आढावा बैठक घेतली.
बैठकीत त्यांनी ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासारख्या साधनांचा उपयोग करून जलसंधारण व पुनर्भरण या कार्यक्रमावर भर देण्यात यावा, असे आवाहन ग्रामस्थांना केले. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती उपसभापती सिद्रामप्पा दुलंगे तर प्रमुख उपस्थितीत तहसीलदार शशिकांत गायकवाड, तालुका कृषी अधिकारी हनुमंत ममदे, राहुल पाटील सास्तूरकर, किशोर साठे, जेवळीकर, सुनील माने, रशीद काझी आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक अमितकुमार अचलेरकर यांनी केले.