उस्मानाबाद -: येथील सुफी संत ख्वॉजा शमशोद्दीन गाझी रहे यांच्या उरुसास गुरुवारी (दि.23) रोजी प्रारंभ होत आहे. 1 जूनपर्यंत चालणार्या या उरुसाच्या तयारीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.
उस्मानाबाद येथील उरुसास गुरुवारी प्रारंभ होत असून, यानिमित्ताने उरुसात विविध कार्यक्रमांची रेलचल राहणार आहे. यामध्ये 23 मे रोजी रात्री 7 ते 9 पंखा मिरवणूक, दि. 24 रोजी सायंकाळी सेहरा मिरवणूक, दि. 25 रोजी गुसल पाणी मिरवणूक, दि. 26 रोजी मुख्य संदल मुबारक मिरवणूक, दि. 27 रोजी कव्वाली व चिरागाँ कार्यक्रम, दि.28 रोजी कव्वाली कार्यक्रम, दि. 29 रोजी वाजबयान, धार्मिक कव्वाली, दि. 30 रोजी मुशायरा व दिनांक 1 जून रोजी आतषबाजी व कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत. यासंदर्भात नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये नियोजनासंदर्भात नियोजन करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसीलदार अभिजित पाटील यांच्यासह वक्फ बोर्डाचे महमद शेख, पोलिस निरीक्षक सुरेश घाडगे, मसूद शेख, समियोद्दीन मशायक यांच्यासह पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.