उस्मानाबाद -: परीक्षा देण्यासाठी तुळजापूरहून आलेल्या विवाहित प्रेयसीचा तिच्या लग्नापूर्वीच्या प्रियकराने दगडाने ठेचून खून केला. प्रेयसीला ठार केल्यानंतर प्रियकर स्वत:हून येथील शहर पोलिस ठाण्यात हजर झाला. हा प्रकार सोमवारी (दि. 20) दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाधववाडी रस्त्यालगतच्या डोंगरात घडला.
तुळजापूर येथील राजनंदिनी रवी अंबर (21) हिचे लग्न तीन महिन्यापूर्वीच झाले होते. तिचे माहेर वडगाव (सि. ता. उस्मानाबाद) असून तिचे लग्नाअगोदर संग्राम राजेंद्र साळुके (27, रा. यशवंतनगर, बार्शी नाका, उस्मानाबाद) याच्याशी प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही त्यांचे संबंध सुरू होते. संग्राम तुळजापूरला जाऊन राजनंदिनीला सातत्याने भेटत होता. बीएची परीक्षा असल्याच्या कारणावरून ती माहेरी वडगाव येथे आली होती. शहरातील एका महाविद्यालयामध्ये तिची परीक्षा सुरू होती. परीक्षेदरम्यानही दोघे एकमेकांना भेटत होते. मंगळवारी बीए तृतीय वर्षाचा इतिहासाचा पेपर होता. पेपर अर्धवट सोडून राजनंदिनी महाविद्यालयाच्या बाहेर आली. अगोदरच तेथे संग्राम दुचाकी घेऊन तिची प्रतिक्षा करीत होता. विशेष म्हणजे महाविद्यालयाच्या पुढच्या प्रवेशद्वारावर तिचा भाऊ तिची प्रतीक्षा करीत उभा होता. यामुळे ती मागच्या द्वाराने बाहेर आली. दोघेही शहरालगतच्या जाधववाडी रस्त्यावरच्या देवकते यांच्या शेताजवळील डोंगरावर आले. त्यांच्या मध्ये लग्न करण्यावरून कुरबूर झाली. याचे पर्यवसान मोठय़ा वादात झाले. यामध्ये रागाच्या भरात संग्राम याने राजनंदिनीच्या डोक्यात दगडाने वार केले. तीन मोठे दगड त्याने मारल्यामुळे डोक्याचा चेंदामेंदा झाला. राजनंदिनी जागीच ठार झाल्याची खात्री झाल्यावर संग्राम आपणहून शहर पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने खून केल्याची कबूली देऊन आपल्याच विरुद्ध जबाब दिला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली कडूकर करीत आहेत.
पोलिसांनी राजनंदिनी व संग्राम यांचे मोबाईल हँडसेट हस्तगत केले आहेत. तसेच घटनास्थळावरुन तीन मोठे दगडही जप्त करण्यात आले आहेत. तिन्ही दगड रक्ताने माखले आहेत. राजनंदिनीला डोंगराच्या लहान कपारीत ठार मारले. यामुळे दुपारी 3 वाजेपर्यंत या संदर्भात कोणालाही माहिती नव्हती. संग्राम पोलिस ठाण्यात आल्यावरच हा प्रकार सर्वांना समजला. यानंतर घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

असे जुळले प्रेमसंबंध
राजनंदिनी व संग्राम यांनी शिक्षणशास्त्रातील पदविका संपादन केली आहे. दोघेही एकाच वर्गात होते. यादरम्यान ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्याच वेळी दोघांनी लग्न करण्याचे ठरवले होते. मात्र, संग्रामचे करिअर घडत नव्हते म्हणून लग्नाचा बेत मागे पडत होता. यानंतर राजनंदिनीने बीएच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. तर संग्रामने शिक्षणशास्त्रातून पदवीचे शिक्षण घेतले. यादरम्यान त्यांचे प्रेमसंबंध सुरू होते. राजनंदिनीच्या घरच्यांनी तीन महिन्यांपूर्वी तिचे दुसर्याशी लग्न लावून दिले.

यामुळे मारले ठार
राजनंदिनीचे पती रवी अंबर हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. राजनंदिनी लग्नानंतरही संग्रामसोबत पळून जाऊन विवाह करणार होती. मात्र, संग्रामला चांगली नोकरी लागल्यानंतर पळून जाण्याचे ठरले होते. मंगळवारी डोंगरामध्ये दोघे चर्चा करत असताना तिने संग्रामला नोकरीबाबत विचारणा केली. संग्रामने 'एमपीएससी'ची परीक्षा देऊन पोलिस निरीक्षक होणार असल्याचे सांगितले. पतीला लाखो रुपये वेतन आहे. पोलिस निरीक्षक झाल्यावर पतीच्या तुलनेत फार कमी वेतन मिळेल. यामुळे दुसरे काहीतरी करण्याचा सल्ला तिने दिला. पतीच्या तुलनेत वेतन कमी मिळणार म्हणून राजनंदिनीने हिणवल्यामुळे संग्रामला राग आला. रागाच्या भरातच त्यांने राजनंदिनीचा खून केला.
पश्चातापाचा लवलेश नाही
संग्रामने स्वत:हून कबुली दिल्यानंतर पोलिस ठाण्यातील संगणक कक्षात त्याचा जबाब देण्याचे काम सुरू होते. यावेळी पोलिसांनी त्याला विचारलेल्या प्रश्नाला तो न अडखळता उत्तरे देत होता. त्याच्या बोलण्यातून त्याला खुनाबद्दल काहीही वाईट वाटत नसल्याचे जाणवत होते. यानंतर काही वेळ त्याला तेथेच ठेवण्यात आले होते. यादरम्यान त्याच्या चेहर्यावर पश्चातापाचा काहीही लवलेश दिसत नव्हता. घटनास्थळावर चॉकलेट व आईस्क्रीमचे रिकामे कप दिसून आले.

* सौजन्य : दिव्यमराठी