उस्मानाबाद -: मराठी पत्रकार परिषदेसी संलग्न असलेल्या उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी संतोष जाधव तर सचिवपदी राजाभाऊ वैद्य यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कोषाध्यक्षपदी संतोष हंबिरे, उपाध्यक्षपदी र्शीकांत कदम (तुळजापूर), प्रमोद कांबळे (भूम), सहसचिवपदी प्रशांत कावरे, प्रांतप्रतिनिधीपदी विजय मुंडे यांची बिनविरोध निवड झाली. तर उस्मानाबाद तालुकाध्यक्षपदी संजय भन्साळी, तुळजापूर अंबादास पोफळे, उमरगा लक्ष्मण पवार, लोहारा इक्बाल मुल्ला, भूम सुनील डुंगरवाल, परंडा सुरेश घाडगे, कळंब पार्श्वनाथ बाळापुरे व वाशी तालुकाध्यक्षपदी मुकुंद चेडे यांची निवड झाली. निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून भाऊसाहेब भन्साळी व साहाय्यक म्हणून विजयकुमार कोकाटे यांनी काम पाहिले.
जिल्हाध्यक्षपदी संतोष जाधव तर सचिवपदी राजाभाऊ वैद्य यांची निवड झाल्याबद्दल 'तुळजापूर लाईव्ह' परिवाराच्यावतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यकिर्दीस लाख लाख शुभेच्छा!
जिल्हाध्यक्षपदी संतोष जाधव तर सचिवपदी राजाभाऊ वैद्य यांची निवड झाल्याबद्दल 'तुळजापूर लाईव्ह' परिवाराच्यावतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यकिर्दीस लाख लाख शुभेच्छा!