![]() |
सौ. अपर्णा अरविंद बेडगे |
नळदुर्ग -: येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी कॉंग्रसेच्या सौ. अपर्णा अरविंद बेडगे यांची बिनविरोध निवड झाली करण्यात आली असून त्यांची निवड झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळून करुन मोठा जल्लोष केला.
नळदुर्ग न.प.चे उपनगराध्यक्ष शहबाज काझी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी सोमवार रोजी विशेष सभा बोलविण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार व्ही.एल. कोळी हे होते. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सौ. अपर्णा बेडगे यांचा एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
ही निवडणूक बिनविरोध करण्याठी नगराध्यक्ष शब्बीर सावकार, मावळते उपनगराध्यक्ष शहबाज काझी, नितीन कासार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते नय्यर जहागिरदार यांनी प्रयत्न केले. उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक देविदास राठोड, अपक्ष नगरसेवक संजय बताले, तसेच स्वीकृत नगरसेवक अमृत पुदाले व सचिन डुकरे हे गैरहजर होते. उपनगराध्यक्ष बेडगे यांची निवड होताच नगराध्यक्ष शब्बीरअली सावकार, तहसिलदार व्ही.एल. कोळी, माजी नगराध्यक्ष नितीन कसार, मावळते उपनगराध्यक्ष शहबाज काझी, राष्ट्रवादीचे गटनेते नय्यर जहागिरदार, शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर चव्हाण यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.