नळदुर्ग -: वादळी वा-यासह मेघगर्जना होऊन नळदुर्ग शहर व परिसराला जोरदार पावसाने झोडपून काढले. प्रचंड वादळी वा-यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी पाटी (ता. तुळजापूर) जवळ वडाचे वृक्ष उन्मळून पडल्याने महामार्गावरील वाहतूक तब्बल एक तास खोळंबली होती. तर अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले आहे. बुधवार रोजी नळदुर्ग परिसरात लग्नकार्य मोठ्याप्रमाणावर असल्याने व-हाडी मंडळीचे हाल झाले. तर लग्नमंडप उध्दवस्त झाल्याच्या घटना घडल्या.
नळदुर्ग शहरासह तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी, धनगरवाडी, सराठी, चव्हाणवाडी, शिरगापूर, इटकळ, बाभळगाव यासह अनेक ठिकाणी बुधवार दि. 29 मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने झोडपून काढले. यावेळी झालेल्या वादळी वा-यामुळे सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर फुलवाडी पाटीजवळ मोठे वृक्ष उन्मळून पडल्याने महामार्गावरील वाहतूकीचा तब्बल एकतास खोळंबा झाला. दरम्यान, फुलवाडी गावातील युवकांनी अथक परीश्रम करुन झाड बाजूला काढल्याने वाहतूक पूर्ववत सुरळीत सुरु झाली.
या पावसामुळे मुक्या प्राण्यांना व पशुपक्ष्यांसह नागरीकास दिलासा मिळाला आहे. मात्र वादळी वा-यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर अनेक घरावरील पत्रे उडून गेले. त्याचबरोबर वीजपुरवठा खंडीत झाला. असे असले तरी या पावसामुळे ग्रामस्थांच्या चेह-यावर आनंदाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर वडाचे मोठे झाड उन्मळून पडल्याने महामार्गावरील वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. फुलवाडी गावातील अमोल हांडगे, बाबासाहेब वाडेकर, महेश लंगडे, चंद्रकांत लंगडे यांच्यासह युवकांनी उन्मळून पडलेल्या वृक्षाचे फाटे तोडून एकेरी वाहतूक सुरु केले. त्यानंतर तासभरानंतर दोन्हीकडील वाहतुक सुरळीत करुन दिल्याने वाहनधारक व प्रवाशांतून वरील युवकांचे अभिनंदन केले जात आहे.
दरम्यान, बुधवार दि. 29 मे रोजी सर्वत्र लग्नकार्य मोठ्याप्रमाणावर असल्याने जोरदार पावसामुळे लग्नकार्यात व्यत्यय निर्माण झाले. विवाह मंडप जोरदार वा-यामुळे उडून गेले. त्याचबरोबर व-हाडी मंडळीचेही हाल झाल्याचे दिसून आले. सायंकाळी सव्वा सहा वाजता पुन्हा पावसाचे आगमन झाले. अर्धा तास पाऊस झाला. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.