उस्मानाबाद :- सरळसेवा भरती सन 2013 चे अनुषंगाने आरोग्य विभागाचे अधिनस्त संवर्गापैकी अनुक्रमे 1 आरोग्य सेवक पुरुष आरोग्य सेवक महिला व औषध निर्माण अधिकारी या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी अंतिम अर्जाची पात्र, अपात्र उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेमध्ये नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
      पात्र उमेदवारांना हॉल ति‍किट दिनांक 2 ते 8 जुनपर्यंत लेखी परिक्षेच्या एक तास अगोदर देण्यात येणार आहे. ही यादी उस्मानाबाद जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे सदस्य सचिव, जिल्हा निवड समिती तथा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
 
Top