उस्मानाबाद - शैक्षणिक वर्ष 2013-2014 यासाठी अध्यापक शिक्षण पदविका, उस्मानाबाद (D.T.Ed ) प्रथम वर्षासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेण्यासाठी आवेदन पत्र विक्रीची प्रक्रिया सुरु झाली असून प्रवेशास इच्छुक असणा-या कला, वाणिज्य, विज्ञान व एम.सी.व्ही.सी. या शाखेतील पात्र उमेदवारांना इयता 12 वीतील खुल्या प्रवर्गासाठी 50 टक्के व इतर मागास वर्गासाठी 45 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, डी. आय. सी. रोड बार्शी नाक्याजवळ, उस्मानाबाद येथे आवेदन पत्र विक्री व स्विकृती होणार आहे. आवेदन पत्र विक्री दि. 6 जून पर्यंत सुरु राहणार आहे. आवेदन पत्र स्विकृती दि. 8 जुनपर्यंत आहे. आवेदन पत्र माहिती पुस्तिका व सुधारित बदलाची पुरवणी पुस्तिकासह आवेदन पत्र शुल्क खुला प्रवर्गासाठी 200 रुपये तर इतर मागास प्रवर्गासाठी 100 रुपये इतके आहे. आवेदन पत्र विक्री व स्विकृतीची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत (सुटृटीच्या दिवशीही अर्ज विक्री चालू राहिल) असून इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्या,डॉ. कमलादेवी आवटे यांनी केले आहे.