लातूर :- महामहिम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शुक्रवार दि. 31 मे रोजी लातूर दौ-यावर येत आहेत. त्यांच्या दौ-याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
     शुक्रवार दि. 31 मे रोजी सायंकाळी 6-05 वाजता लातूर विमानतळ येथे आगमन होईल. सायंकाळी 6-10 वाजता विश्रामगृहाकडे प्रयाण. सायंकाळी 6-25 वाजता विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. शनिवार दि. 1 जून रोजी सकाळी 10-45 वाजता विश्रामगृह येथून कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. 10-55 वा. कार्यक्रम स्थळी आगमन. सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत दयानंद शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सव सांगता कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12-05 वाजता लातूर विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 12-25 वाजता लातूर विमानतळ येथून प्रयाण.

राज्यपाल के. शंकरनारायणन यांचाही लातूर दौरा
 
 महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांचा लातूर दौरा असून त्‍यांचे शुक्रवार दि. 31 मे रोजी सायंकाळी 6-05 वाजता लातूर विमानतळ येथे आगमन होणार आहे. सायंकाळी 6-10 वाजता विश्रामगृहाकडे प्रयाण. सायंकाळी 6-25 वाजता विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. शनिवार दि. 1 जून रोजी सकाळी 10-45 वाजता विश्रामगृह येथून कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. 10-55 वा. कार्यक्रम स्थळी आगमन. सकाळी  11 ते दुपारी 12 या वेळेत दयानंद शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सव सांगता कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12-05 वाजता लातूर विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 12-25 वाजता लातूर विमानतळ येथून प्रयाण.
 
Top