उस्मानाबाद :- मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, उस्मानाबाद अंतर्गत विविध संवर्गातील गट क व गट ड ची भरती खालीलवेळी व दिवशी परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.
       या परीक्षा वरील केंद्र व परीक्षा केंद्र परिसरात व जिल्हा परिषद कार्यालय परिसरात  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड यांनी कळविले आहे.
       कृषी विस्तार अधिकारी व  विस्तार अधिकारी (कृषी) या पदाची परीक्षा दि. 2 जुन सकाळी 10 ते 11-30 या वेळेत. जिल्हा परिषद (कन्या) प्रशाला, उस्मानाबाद, दि. 8 जुनला औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी, जिल्हा परिषद प्रशाला (मुलांचे)  व वरिष्ठ सहायक लेखा  परीक्षा शरद पवार हायस्कुल, उस्मानाबाद येथे सकाळी 10 ते 11-30 या वेळेत.  आरोग्य सेवक महिला/ पुरुष,  महिला- श्रीपतराव भोसले हायस्कुल (जुनी इमारत), पुरुष-जिल्हा परिषद (कन्या प्रशाला) पहिला मजला, उस्मानाबाद येथे दुपारी 2 ते 3-30 या वेळेत, कनिष्ठ आरेखक पदाची परीक्षा जिल्हा  परिषद (कन्या प्रशाला) तळमजला, उस्मानाबाद येथे. दु .2 ते 3-30 या वेळेत, कंत्राटी ग्रामसेवक परीक्षा 9 जुन रोजी सकाळी 10 ते 11-30 या वेळेत. श्रीपतराव भोसले हायस्कुल (नवीन इमारत), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक परीक्षा- दुपारी 2 ते 3-30 या वेळेत. जिल्हा परिषद (कन्या प्रशाला), उस्मानाबाद, पशुधन पर्यवेक्षक परीक्षा 16 रोजी सकाळी 10 ते 11-30 या वेळेत. जिल्हा परिषद (प्रशाला मुलांचे), उस्मानाबाद, कनिष्ठ सहायक लिपीक- परीक्षा 16 जुन रोजी दुपारी 2 ते 3-30 श्रीपतराव भोसले हायस्कुल (नवीन इमारत), उस्मानाबाद, कनिष्ठ सहाय्यक लिपीक परीक्षा-श्रीपतराव भोसले हायस्कुल, नवीन इमारत, उस्मानाबाद, कनिष्ठ सहाय्यक (लेखा), परीक्षा 2 ते 3-30 जिल्हा परिषद (प्रशाला मुलांचे), उस्मानाबाद, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) व लघुलेखक (नि.श्रे.)  परीक्षा 22 जुन रोजी  सकाळी 10 ते 11-30 पर्यंत जिल्हा परिष्द (कन्या प्रशाला), उस्मानाबाद, कनिष्ठ  लेखाधिकारी परीक्षा 22 रोजी दुपारी 2 ते 3-30 जिल्हा परिषद (प्रशाला मुलांचे), उस्मानाबाद
      परिचर वर्ग 4 या पदाची लेखी परीक्षा- 22 जुन रोजी दु.2 ते 3-30 या वेळेत श्रीपतराव भोसले हायस्कुल (नवीन इमारत), उस्मानाबाद, छत्रपती शिवाजी हायस्कुल, उस्मानाबाद, श्रीपतराव भोसले हायस्कुल (जुनी इमारत), उस्मानाबाद, आर्य चाणक्य विद्यालय, उस्मानाबाद, अभिनव इंग्लिश स्कुल, उस्मानाबाद, सरस्वती हायस्कुल, उस्मानाबाद, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, उस्मानाबाद, तेरणा इंजिनिअरींग कॉलेज, उस्मानाबाद व  शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, उस्मानाबाद या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.
    या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात घोषणा देण्यास, परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय या परिसरातील झेरॉक्स सेंटर्स , पानपट्टी, टायपींग सेंटर, एस.टी.डी.बुथ, ध्वनीक्षेपक, कॉम्पूटर सेंटर्स तसेच इंटरनेट कॅफे बंद राहतील. परीक्षा केंद्र परिसरात मोबाईल, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर कोणत्याही वाहनास प्रतिबंध असेल. केवळ संबंधित परीक्षा केंद्रांवर नेमणूक केलेले अधिकारी/ कर्मचारी , शासकीय कामावरील अधिकारी व कर्मचारी, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि उमेदवारांनाच परीक्षा केंद्रांवर प्रवेश असेल. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर आवारात 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. हे आदेश संबंधित दिवशी लागू राहणार आहेत.
 
Top