उस्मानाबाद :- जिल्हा परिषद, उस्मानाबाद (ग्रामपंचायत विभागांतर्गत) कंत्राटी ग्रामसेवक या पदाची लेखी परीक्षा 9 जुन रोजी होणार आहे. या लेखी परीक्षेबाबत उमेदवारांना प्रवेशपत्र दि. 2 जुन पासून (ग्रामपंचायत विभाग), जिल्हा परिषद येथे वितरीत करण्यात येणार आहे.
     प्रवेशपत्र हस्तगत करण्यासाठी उमेदवारांनी स्वत: अर्जाची पोहोच पावती सादर करावी तसेच टपालाने अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी त्यांचे ओळखपत्र सादर करावे, असे आवाहन सदस्य सचिव, जिल्हा निवड समिती तथा उप- मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top