सोलापूर -: पुण्यातील 'नाते समाजाशी' आणि 'जयहिंद परिवार' या संस्थांच्यावतीने देण्यात येणारा गौरव महाराष्ट्राचा पुरस्कार लोकमंगल उद्योग समुहाचे संस्थापक माजी खासदार सुभाष देशमुख यांना जाहीर झाला आहे.
रविवार दि. १२ मे रोजी पुण्यातील नव्या पेठेत असलेल्या एस.एम. जोशी सभागृहात होणार्या समारंभात हा पुरस्कार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पवार राहणार आहेत. या समारंभात ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, निवृत्त कर्नल मोहन काकतिकर, उद्योजक डी.एस. कुलकर्णी यांचाही पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे, असे संयोजक नारायण फंड यांनी सांगितले. सुभाष देशमुख यांच्या गौरवाने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.