पंढरपूर -: पाण्यासाठी आंदोलन करणार्या दुष्काळी शेतकर्यांबद्दल अपशब्द वापरणारे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी उजनीच्या दोन्ही कालव्यात पाणी सोडले नाही तर कार्तीकी एकादषीनिमित्त पंढरीत त्यांना विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी दिला आहे.
गुरूवारी आझाद मैदान येथून आंदोलकांनी शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध व्यक्त करत अंगावर चाबकाचे फटके मारून घेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे मोर्चा वळविला. मात्र, वाटेतच त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले व आंदोलन गुंडाळले. यावेळी पोलीसांनी प्रभाकर देशमुख, दत्तात्रय कदम, निंबाळकर, विकास जाधव यांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकांनी शासनाला जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा इशारा पुन्हा एकदा दिला आहे.
उजनी धरणाच्या दोन्ही कालव्यातून पिण्यासाठी पाणी सोडावे या मागणीसाठी गेली ९५ दिवस आझाद मैदानावर धरणे आंदोलनास बसलेले सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत. गुरूवार ९ मे रोजी संघटनेचे आंदोलनकर्ते सकाळी ११.३0 वाजता शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्वत:च्या अंगावर चाबकाचे फटके मारून घेत आंदोलकांनी मुख्यमंत्र्या वर्षा व उपमुख्यमंत्र्यांच्या देवगिरी बंगल्यासमोर धडक मोर्चा काढला.
पुण्यातील कोणत्याही धरणाचे पाणी उजनी धरणात सोडन ते पाणी उजनीच्या डाव्या व उजव्या कालव्यात तसेच आष्टी तलावात सोडावे या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी गेली ९५ दिवस मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलनाला बसले आहेत. यादरम्यान आंदोलकांनी १0 विविध आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्र्यांनी २२ मार्चला आंदोलकांच्या शिष्टमंडळाला उजनीच्या कालव्यातून पाणी सोडण्याबाबत ठोस आश्वासन दिल्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटल आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांना या आश्वासनाचा विसर पडला असून एक महिन्यापासून आंदोलक मुख्यमंत्र्यांची भेट मागत आहेत. मात्र, दुष्काळी भागातील आंदोलकांकडून समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नसल्याचेच दिसते. भेट न देण्यामागचे कारणही आंदोलकांना सांगितले जात नाही. याबाबत आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे.