नळदुर्ग -: गुरुवार दि. 9 मे रोजीपासून कर्नाटक राज्‍यातील बगदल (जि. बिदर) येथे हजरत सय्यद अब्‍दुल शाह वली गंजे सवाई गंजे बक्ष बादशाह नागोरी (आर.ए.), दर्गाह आसताना ए खादरिया गंजे सवाई गंजे बक्ष बादशाह नागोरी (आर.ए.) मोहल्‍ला गडी, बगदल शरीफ यांचा 456 वा उर्सास मोठ्या उत्‍साहाने सुरुवात झाली.
    उर्सानिमित्‍त संपूर्ण दर्गाह व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्‍यात आली आहे. गुरुवार रोजी दिवसभर कर्नाटक राज्‍यासह आंध्रप्रदेश, महाराष्‍ट्र राज्‍यातून हजारोच्‍या संख्‍येनी भाविक बगदल या ठिकाणी दाखल होत होते. उपस्थित भाविकांना दर्गाह परिसरात शाह खलीफा अलहाज मुहम्‍मद इदरीस अहमद साहाब खादरी यांच्‍यावतीने जागोजागी लघुशंका, शौचालय याची व्‍यवसाय करण्‍यात आली आहे. त्‍याचबरोबर हजारो भाविकांसाठी मोफत भोजनाची व राहण्‍याची सुविधा उपलब्‍ध करुन स्‍वच्‍छ व शुध्‍द पिण्‍याचे पाणी उपलब्‍ध केले आहे. दरम्‍यान मन्‍नाकली विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार अशोक खेडे यांनी दर्ग्‍यास भेट देवून दर्शन घेतले. उर्सनिमित्‍त पोलीसांचा चोख बंदोबस्‍त आहे.
 
Top