अँनिमेशन म्‍हणजे साध्‍या भाषेत सांगायचे तर स्‍वप्‍नांची दुनिया. आपण जो विचार करतो, तो संगणकावर सॉफ्टवेअरच्‍या माध्‍यमातून बनविणे म्‍हणजे अँनिमेशन. ही एक कला असून यामध्‍ये कुठल्‍याही वस्‍तूला व्हिज्‍युएलाईज करुन पहिल्‍यांदा पेपरवर ड्रॉ करावे लागते आणि नंतर ते डिझाईन कॉम्‍प्‍युटरमध्‍ये पुन्‍हा साकार करायचे असते. आपण जेवढया नावीन्‍यपूर्ण पध्‍दतीने आणि अगदी वेगळा विचार करुन अँनिमेशनद्वारे लोकांपर्यत पोहोचायचे असते. हे अतिशय मनोरंजक आणि निर्मितीक्षम क्षेत्र आहे. या ठिकाणी तुम्‍ही गाढवाला पंख लावून आकाशात उडवू शकता आणि वाघाला व्‍हेज बर्गर खाऊ चालू शकता. या क्षेत्रात कुठलीही मर्यादा नसते. जो विचार केला किंवा स्‍वप्‍नात बघितले त्‍याला आपण आकार देऊ शकतो. विचार करणारी आणि अतिशय वेगळ्या कल्‍पना करणा-या व्‍यक्‍तीला या क्षेत्रात भरपूर वाव असतो. आज चित्रपट सृष्‍टीमध्‍ये जवळपास 80 टक्‍के चित्रपटात अँनिमेशनचा आधार घेतला जातोञ अँनिमेशन प्रामुख्‍याने दोन प्रकारचे असते. टूडी आणि थ्रीडी. यामध्‍येही अनेक प्रकार असतात. म्‍हणजे कार्टून अँनिमेशन, रिअँलिस्‍टीक अँनिमेशन, सेमीरिअँलिस्‍टीक अँनिमेशन इत्‍यादी. आता टेक्‍नॉलौजीमध्‍ये रोज काही ना काही नवे होताना दिसते. त्‍यामुळेच आता टूडी आणि थ्रीडी नंतर 4 डी आणि 5 डी यासारखे तंत्रदेखील आले आहे.
टूडी अँनिमेशन - याचा अर्थ टू-डायमेन्‍शन म्‍हणजेच द्विमितीय. यामध्‍ये कुठलीही खोली नसते. म्‍हणजे चित्र एकदम सपाट दिसते. चित्र पेपरवर काढून संगणकावर सॉफ्टवेअरच्‍या मदतीने रंगीत केले जाते. त्‍याचे उत्‍तम उदाहरण म्‍हणजे टॉम अँण्‍ड जेरी आणि मिकीमाऊस यासारखे कार्टुन्‍स होय.
थ्रीडी अँनिमेशन - हे त्रिमितीय चित्र असते. यामध्‍ये खोलीदेखील दिसते. कुठल्‍याही बाजूने बघितले तरी ती खोली दिसते. आर्ठस एज, मेडागास्‍कर, रियो यासारख्‍या चित्रपटात हे तंत्रज्ञान बघता येते.

कार्टून अँनिमेशन - या अँनिमेशनमध्‍ये पात्राची काही मर्यादा नसते. म्‍हणजे त्‍याची शरीररचना कशीही असू शकते. म्‍हणजे तोंड मोठे असू शकते आणि इतर शरीर लहान असू शकते. कार्टून कितीही लांब, जाड, बारीक किंवा चपटे होते. वास्‍तवात असे मानवी शरीराबाबत होऊ शकत नाही. टॉम अँण्‍ड जेरीमध्‍ये टॉम कुठल्‍याही मशिनमध्‍ये जाऊन तसाच आकार धारण करुन बाहेर पडतो. हिच या तंत्राची कमाल आहे. हे तंत्र टूडी किंवा थ्रीडीनंतरही वापरले जाते. 
रिअँलिस्टिक अँनिमेशन - या तंत्रामध्‍ये कॅरेक्‍टर आणि बॅकग्राऊंड एकदम खरे वाटते. स्‍पायडरमॅन, सुपरमॅन, अँव्‍हेंजर्स, 2012 इत्‍यादी असे अनेक चित्रपट आहेत. ज्‍यामध्‍ये या तंत्राचा वापर केला गेला आहे. मात्र त्‍या अँनिमेटेड असतात. आपण जे दृश्‍य खरे समजून बघतो ते वास्‍तवात ते संगणकात डेव्‍हलप करुन बनविलेले अँनिमेशन असते आणि थ्रीडी बनवून सादर केले जाते.
थ्रीडी चित्रपट - हे चित्रपट दोन प्रकारचे असतात. त्‍यापैकी एक म्‍हणजे जे साध्‍या डोळ्यांनी बघता येऊ शकतात आणि दुसरा प्रकार म्‍हणजे जे बघण्‍यासाठी विशिष्‍ट प्रकारच्‍या थ्रीडी चष्‍म्‍याची गरज भासते. चष्‍म्‍याद्वारे बघता येऊ शकणारा चित्रपट थ्रीडी स्टिरीओस्‍कोपीक मुव्‍ही म्‍हणून ओळखला जातो. असा चित्रपट बघितल्‍यानंतर असे जाणवते की, जणू सर्वकाही आपल्‍या आजूबाजूलाच होत आहे. 
4 डी चित्रपट - हे एक आणखी पुढचे तंत्र आहे. त्‍यासाठी थिएटरचे वातावरणे असे बनवले जाते, ज्‍यामुळे आपल्‍याला चित्रपटात घडणा-या प्रत्‍येक गोष्‍टीचा अनुभव होतो. जसजसा कॅमेरा हलतो तसे थिएटरमध्‍ये आपल्‍या खुर्च्‍या देखील हलतात. चित्रपटात पाऊस पडत असेल तर थिएटरमध्‍ये देखील पाणी पडल्‍यासारखी जाणीव होते. 
5 डी चित्रपट - हे 4 डी पेक्षा जास्‍त आधुनिक तंत्र आहे. यामध्‍ये पात्रे आपल्‍याला अगदी  जवळ दिसतात. पडद्यावर निघणारा धूर देखील आपल्‍या आजूबाजूला पसरताना दिसतो.
 
Top