नळदुर्ग -: डोकेदुखीच्या आजाराला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे फुलवाडी (ता. तुळजापूर) गावाच्या शिवारात घडली.
बसवराज अण्णाप्पा कलशेट्टी (वय 32, रा. आलूर, ता. उमरगा) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. यातील बसवराज कलशेट्टी हा मागील काही दिवसांपासून डोकेदुखीच्या आजाराने त्रस्त होता. या आजारावर उपचारासाठी पुण्याला जातो, असे सांगून तो सोलापूर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्या भावाकडे गेला. तेथून भावाची दुचाकी घेऊन फुलवाडी शिवारात येऊन रेवणसिद्ध उजणे यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.