उस्मानाबाद -: येथील ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहेमतुल्ला अलैह यांच्या 708 व्या उरुसास आज गुरुवारी दि.23 मे रोजी पासून प्रारंभ होत आहे. यामध्ये गुरुवार दि. 23 मे रोजी सायंकाळी पंखा मिरवणूक होणार आहे. दि. 24 मे रोजी सायंकाळी सेहरा मिरवणूक तर दि.25 मे रोजी गुसुल पाणी मिरवणूक, दि. 26 मे रोजी संदल मिरवणूक, दिनांक 27 रोजी रात्री 2 वाजता दर्गाह परिसरात चिराग कार्यक्रम होईल. तसेच दि.28 मे रोजी सकाळी 8 वाजता दर्गाह परिसरात जियारत, फातेहा खानी व महाप्रसादाचे वाटप होणार आहे. दि. 29 मे रोजी महफिले शमा ही धार्मिक कव्वाली होईल, दि. 30 मे रोजी रात्री मुशायरा तर दि.31 मे रोजी गजल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 1 जून रोजी दुपारी मैदानी कुस्ती स्पर्धा व रात्री 9 वाजता शोभेची दारू उडवण्याचा कार्यक्रम होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन शेख लइक अहमद सरकार यांनी केले आहे.
 
Top