मुंबई :- प्रियकरासोबतच्‍या वादातून मुंबईतील एका तरुणीने चॅटिंग सुरु असतानाच वेबकॅमसमोर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चॅटिंग करताना झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला आहे.
    शोभना (वय 26) नावाची तरुणी आपल्या प्रियकरासोबत बुधवारी रात्री चॅटिंग करत बसली होती. याच दरम्यान दोघांमध्ये वाद सुरु झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की शोभनाने प्रियकराला आत्महत्या करण्याची धमकी दिली. इतक्‍यावरच न थांबता तिने वेबकॅमसमोरच फॅनला ओढणी लटकवून गळफास घेतला.
   हा सर्व प्रकार प्रियकर कॉम्प्युटर स्क्रीनवर पाहत होता. शोभना आत्महत्या करत असताना त्‍याने तिच्‍या बहिणीला फोन करून सांगितले. परंतु, ती घरी जाईपर्यंत शोभनाचा जीव गेला होता. पोलिसांनी शोभनाचा लॅपटॉप, मोबाईल तपासणीसाठी ताब्यात घेतला असून आत्‍महत्‍येच्‍या कारणाचा ते शोध घेत आहेत.

 * सौजन्‍य - दिव्‍यमराठी
 
Top