उस्मानाबाद :- समस्याग्रस्त व पीडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी व अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक व्हावी, यासाठी सोमवार दि. 27 मे रोजी तहसील कार्यालय, लोहारा येथे महिलांसाठी लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.
या लोकशाही दिनात महिलांची वैयक्तीक स्वरुपाची तक्रार, निवेदन विहीत नमुन्यात स्विकारले जाणार आहेत. अर्जाचा विहीत नमुना अर्ज सदस्य सचिव, तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन समिती, लोहारा येथे सादर करुन या लोकशाही दिनाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी, लोहारा यांनी केले आहे.