उस्मानाबाद :- जे माजी सैनिक सन 1986 पुर्वी सैन्यातून सेवानिवृत्त झाले आहेत व पेन्शनधारक आहेत, परंतु त्यांनी अद्याप त्यांच्या पत्नीचे नाव (Endorsement of family pension ) पेन्शनसाठी लावले नाही, अशा सर्व पेन्शनधारकांनी त्वरीत आपल्या पत्नीच्या नावाने पेन्शन मिळण्यासाठीचे फॉर्म त्वरीत भरुन दयावे, असे आवाहन मेजर सुभाष सासने (नि), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
माजी सैनिकांच्या मृत्युनंतर त्यांच्या पत्नीला पेन्शन मिळण्यासाठी कमीत कमी सहा ते आठ महिन्याचा कालावधी लागतो आणि पेन्शन पेपरची पुर्तता करण्यासाठी पत्नीला बराच मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागतो. हा विलंब टाळण्यासाठी पेन्शन फॉर्म भरुन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पत्नीच्या नावाने पेन्शन मिळण्यासाठी आवश्यक फॉर्म जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध आहेत.