उस्मानाबाद :- शासकीय अपंग बालगृह व शाळा, मिरज जि.सांगली येथे 2013-14 या शैक्षणिक वर्षासाठी  इयत्ता 1 ली ते 4 थीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या शासकीय निवासी संस्थेत वसतिगृहात अपंग, मुला-मुलींना  प्रवेश देण्यात येते. आवश्‍यक अस्थिव्यंगोपचार तज्ञांच्या सल्लानुसार, गरजेनुसार शस्त्रक्रिया व उपचार, गरजेनुसार कृत्रिम अवयव कुबडया, तीन चाकी सायकल वाटपही करण्यात येते.
     प्रवेशासाठी प्रवेशित अस्थिव्यंग 6 ते 14 वर्ष वयोगटातील असावा. प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी  अधीक्षक, शासकीय अपंग बालकगृह व शाळा, मिरज, किल्ला भाग, प्रांत कार्यालयाच्या पाठीमागे, मिरज,  जि. सांगली (दुरध्वनी क्रमांक -0233-2222513- 9325555981/ 9422481504) येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  
 
Top