उस्मानाबाद -: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
    शुक्रवार,दि. 24 मे रोजी सकाळी 8  वाजता अणदूर ता. तुळजापूर येथे आगमन व राखीव. स. 9 वाजता अणदूर येथून शासकीय विश्रामगृह, तुळजापूरकडे प्रयाण. स. 10-30 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व विविध स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती.  सकाळी 11-30 वा. उस्मानाबादकडे प्रयाण. स. 12-10 वा. शासकिय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. दु. 1 वा. शासकीय वाहनाने भूमकडे प्रयाण. दु.2-30 वा. भूम येथे आगमन व हाडोंग्री येथील जनावरांच्या छावणीस भेट. राखीव व सोईनुसार शासकीय वाहनाने अणदूर, ता. तुळजापूरकडे प्रयाण. आगमन व मुक्काम.
    शनिवार,दि.25 रोजी सकाळी 9 वा. अणदूरहून शासकीय विश्रामगृह, तुळजापूरकडे प्रयाण. सकाळी 10-30 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर  येथे आगमन व विविध स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती. स. 11-30 वा. उस्मानाबादकडे प्रयाण. दु. 12-10 वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. उस्मानाबाद येथे विविध कार्यक्रमात उपस्थित व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा व  सोईनुसार शासकीय वाहनाने अणदूर ता. तुळजापूरकडे प्रयाण आगमन व मुक्काम.
       रविवार, दि. 26 मे रोजी सकाळी 10 वा. अणदूर येथून शासकीय विश्रामगृह, उस्मानाबादकडे प्रयाण. स. 11-15 वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव व  सोईनुसार शासकीय वाहनाने अणदूर ता. तुळजापूरकडे प्रयाण. आगमन व मुक्काम.
    सोमवार, दि. 27 मे रोजी सकाळी 8 वा. ता. उस्मानाबाद व भूम तालुक्यातील विविध कार्यक्रमात उपस्थिती. दुपारी 4 वा. शासकीय वाहनाने अणदूर, ता. तुळजापूरकडे प्रयाण. आगमन व राखीव. सायं. 6-30 वा. अणदूरहून सोलापूरकडे  प्रयाण. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव. रात्री 10-45 वा. सोलापूरहून सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
 
Top