बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील आर.एस.एम. समाज सेवा आणि सदगुरु परमार्थिक ट्रस्ट, इंदौर संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात बौध्द धर्मीय तीन, मुस्लीम धर्मीय दोन आणि हिंदू धर्मीय पस्तीस अशा चाळीस जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा श्री भगवंत मैदान येथे संपन्न झाला.
यावेळी आमदार दिलीप सोपल, ह.भ.प. जयवंत बोधले महाराज, आयोजक राजेंद्र मिरगणे, राष्ट्रवादी छात्र कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मनीष बाजपेयी, अमोल खताळ पाटील, सोनारी देवस्थानचे पुजारी महाराज, दत्ताजी साळुंखे, अरुण कापसे, नाना कदम, राजा काकडे आदीजण उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आ. दिलीप सोपल म्हणाले की, हा देखणा सोहळा समाजाच्या गरजेचे असल्याने आपल्याला यातून आनंद होत आहे. मिरगणे यांनी सामाजिक भान ठेवून केलेल्या अनेक उपक्रमापैकी हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. सामुदायिक विवाह हा समाजाची प्रकर्षाने निर्माण झालेली गरज असून अशा कार्यक्रमातच सर्वजण एकत्रित येतात. अनेकांना अनेक लग्नात एकत्र उपस्थित राहता येत नाही. त्यामुळे निर्माण झालेली फार मोठी समस्या सुटत आहे.
प्रास्ताविकात राजेंद्र मिरगणे म्हणाले की, दुष्काळाच्या परिस्थितीत मेटाकुटीला आलेल्या समाजाला गरजेच्या असलेल्या विवाह संस्कारातील अनावश्यक खर्च टाळून, सामाजिक स्थितीला दिलासा देण्याचा अल्पसा प्रयत्न होत आहे. दुष्काळावर नुसते बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करणे याला महत्त्व देऊन यापुढे राजकीय विरोधाची संपूर्ण तयारी केल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
भगवंत मैदान येथे हा विवाह सोहळा पार पडला. कन्या प्रशाला व मॉडेल हायस्कूल येथे व-हाडी मंडळींच्या भोजनाची सोय करण्यात आली होती. वधू वरांना संपूर्ण पोशाख, मंगळसूत्र, संसारोपयोगी भांडी संच इत्यादी आवश्यक वस्तू देण्यात आल्या. शहरातून सजविलेल्या ट्रॅक्टरवर वरांची पारण्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ह.भ.प. जयवंत यांनी विचार मांडले. सूत्रसंचालन सोमेश्वर घाणेगावकर यांनी केले.

क्षणचित्रे
* सर्वधर्मीय विवाह
* सर्व जाती धर्मांच्या नागरिकांची मोठ्या संख्येनी उपस्थिती
* जाती धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे विवाह लावण्यात आले.
* हर्षित अभिराज यांनी गायलेल्या 'जागोजागी भेटत असते माझी मुलगी' या प्रदीप निफाडकर यांच्या भावनिक गाण्याने आलेल्या व-हाडींच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
* सजविलेल्या सात ट्रॅक्टरमधून वरांची सवाद्य पारणे मिरवणूक
* सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन
* या सोहळ्यास उस्मानाबाद मतदार संघातील अनेक खेड्यापाड्यांहून नागरिकांनी येऊन वधू-वरांना आशिर्वाद दिले.
* संपूर्ण दिवसभर बार्शी शहरात लगीनघाई दिसून आली.
* सुमारे 35 हजार लोकांच्या पंक्ती
* 'बेटी बचाओ, जल बचाओ' चा नारा