नळदुर्ग -: रिपब्लिकशन पार्टी ऑफ इंडियाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांच्यावर झालेल्या खूनी हल्ल्याचा रिपाइं तुळजापूर तालुका शाखेच्यावतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे.
या संदर्भात रिपाइंच्यावतीने नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना एक लेखी निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांच्यावर दि. 20 मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास येडशी (ता.जि. उस्मानाबाद) येथे खूनी हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खूनी हल्ला करणा-यावर रिपाइं तुळजापूर शाखेच्यावतीने तीव्र निषेध करण्यात येत असून याप्रकरणी दोषीविरूद्ध कडक कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनावर रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे, तालुकाध्यक्ष एस.के. गायकवाड, अरुण लोखंडे, बाबासाहेब बनसोडे आदींच्या सह्या आहेत.