उस्मानाबाद :- जे माजी सैनिक सैन्यातून सेवानिवृत्त झाले आहेत व पेन्शनधारक आहेत, त्यांना केंद्र व राज्य शासनामध्ये पुर्ननियुक्त होवून सेवानिवृत्त झाले अशा माजी सैनिक सैन्य सेवा निवृत्तीवेतन झालेल्या सेवानिवृत्ती वेतन मिळत आहे. परंतु माजी सैनिकाचे विधवा पत्नी माजी सैनिक मृत्यु पावल्यास सैन्यातील फॅमिली पेंन्शन किंवा पुर्ननियुक्त झालेल्या केंद्र, राज्य सरकारची फॅमिलीपेंशन  या दोघांपैकी एकच पेंशन मिळत होती.
      परंतु पीसीडीए पेंन्शन अलाहाबाद यांचे आदेशान्वये दि.17 जानेवारी,13 व दिनांक 24 सप्टेंबरपासून मयत माजी सैनिकाचे विधवास दोन्ही फॅमिली पेंशन  मिलट्रीची व पुर्ननियुक्त सेवेची नागरी पेंशन  योजना लागू करण्यात आली आहे.
     तरी ज्या माजी सैनिकाचे विधवानी पुनर्वनियुक्त केंद्र व राज्य  शासनाची फॅमिली पेंनशसाठी विकल्प दिलेला असेल, त्यांनी सैन्य सेवेची फॅमिली पेंशन मिळण्यासाठी अर्ज करावा. तसेच ज्या माजी सैनिकाचे विधवांनी सैन्य सेवेच्या पेंशनसाठी विकल्प दिलेला असेल त्यांनी पुर्ननियुक्त झालेल्या केंद्र व राज्य सरकारमधील सेवा केलेल्या विभागात पेंशन मिळण्याकरीता अर्ज करावा, असे आवाहन मेजर सुभाष सासने (नि), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,  उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top