उस्मानाबाद :- शासकीय व निमशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अंध, र्क्षीणवदृष्टी, मुकबधीर, अस्थिव्यंग प्रवर्गातील कर्मचा-यांना सहाय्यक तंत्रज्ञान उपकरण वापरासंबंधी माहिती व्हावी त्यांच्यात जागृती व्हावी आणि या उपक्रमाबाबत प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी  सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्यावतीने औरंगाबाद येथे येत्या दि. 27 मे रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन  करण्यात आले आहे.
      सदरील  कार्यशाळा सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत औरंगाबाद येथील मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र, सलिम अली सरावरासमोर  मजनू हिल, टि. व्ही. सेंटर रोड  सभागृहात आयोजन करण्‍यात आले आहे. कर्मचा-यांना कार्यशाळेस वेळेवर उपस्थित राहण्यासाठी कार्यालय प्रमुखांनी सूचना देवून त्यांच्या नावाची यादी व मोबाईल क्रमांकसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग किलेअर्क, औरंगाबाद यांचेकडे स्पीड पोस्ट व ईमेल spldswoaurangabad@yahoo.com या पत्यावर पाठवावेत. तसेच वेळेवर कर्मचारी पाठवावेत. सर्व प्रवर्गातील अपंग असलेल्या कर्मचाऱ्यानी  लाभ घ्यावा,असे आवाहन  सहाययक आयुक्त, समाज कल्याण उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top