![]() |
शोभागोपाल यादव |
नागदा :- बारा वर्षांपूर्वी आलेल्या नायक चित्रपटात पत्रकार असलेल्या अनिल कपूरला एक दिवसासाठी राज्याचा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळते. एका दिवसात तो चांगली कामे करून चित्र बदलून टाकतो. अशीच एक दिवसासाठी शहराचा प्रथम नागरिक (नगराध्यक्ष) होण्याची संधी मध्य प्रदेशात नागदा येथील 18 वर्षीय विद्यार्थिनी सुनंदा नागेंद्र खैरवार हिला 28 मे रोजी प्राप्त होणार आहे. शहराच्या खर्या नगराध्यक्षा शोभागोपाल यादव यांनी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी बारावीत टॉपर ठरणार्या विद्यार्थ्याला एक दिवसासाठी नगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्याची घोषणा केली होती. त्याचे पालन करत सुनंदाला मंगळवारी ही संधी मिळणार आहे.
सुनंदाने यंदा बारावीच्या परीक्षेत 91.8 टक्के गुण मिळवून नागदा शहरातून प्रधम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. यामुळे घोषणेनुसार तिला एक दिवसासाठी शहराची प्रथम नागरिक होण्याची संधी मिळणार आहे. एवढेच नव्हे, तर त्या दिवशी तिच्या हस्ते 40 लाख रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पणही केले जाणार आहे. त्या कामांच्या शुभारंभप्रसंगी बसवण्यात येणार्या कोनशिलेवरही तिचेच नाव कोरले जाणार आहे. 28 मे रोजी सकाळी तिला मिरवणुकीने पालिकेपर्यंत आणले जाणार आहे. त्यासाठी शहरात निमंत्रणे वाटण्यात आली आहेत. सुनंदा ग्रेसिम उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. विशेष म्हणजे तिचे वडील नागेंद्र खैरवार ग्रेसिम उद्योगात कामगार आहेत, तर आई अंगणवाडी सेविका आहे.
या नियमाचा आधार : नगराध्यक्षा शोभागोपाल यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार नगरपालिका अधिनियम 1961 च्या कलम 124(ग) अंतर्गत शैक्षणिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी नगर परिषदेला अधिकार सोपवण्यात आला आहे.
अशी होती घोषणा
नागदाच्या नगराध्यक्षांनी घोषणा केली होती की, बारावी परीक्षेत शहरातून टॉप येणार्या विद्यार्थ्यास एक दिवसासाठी पालिकेचा नगराध्यक्ष होण्याचा बहुमान दिला जाईल. त्याची अंमलबजावणी 28 मे रोजी होईल.

* साभार -: दिव्यमराठी