सोलापूर -: राज्यात गुटखा व पानमसाला पदार्थांच्या उत्पादन, साठवणुक, वितरण व विक्रीवर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातुन व जनहितार्थ दृष्टीकोनातुन एक वर्षासाठी 20 जुलै 2012 पासून बंदी घातली आहे. अशा पदार्थांचे उत्पादन, साठवणुक, वितरण व विक्री केल्यास कलम 59 नुसार जास्तीत जास्त 06 वर्षे तुरुंगवास व 5 लाख रुपये पर्यंत द्रव्य दंडाची शिक्षेची तरतुद आहे.
या आदेशाची अंमलबजावणीसाठी दि. 15.5.2013 रोजी मे. बंदगी टी शॉप व त्रिभुवन पान शॉप सोलापूर या दोन ठिकाणी छापा मारुन एकूण 2,339/- रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यामध्ये गुटखा व पानमसाला बंदीचे उल्लंघन करणा-या आजपर्यंत एकूण 74 अन्न व्यावसायिकावर कार्यवाही घेण्यात आलेली आहे व कार्यवाहीचा भाग म्हणून दि. 23.7.2013 रोजी गणेश विलास पंडित, रा. सोनार गल्ली, रांझणी, ता. पंढरपूर जि. सोलापूर या ठिकाणी जप्त केलेला एकुण 3,79,491/- रुपये किंमतीचा गुटखा दि. 9.5.2013 रोजी सोलापूर जिल्हा दुध प्रक्रिया व उत्पादक संघ लि. शाखा पंढरपूर येथे असलेल्या बॉयलरमध्ये जाळून नष्ट करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, सोलापूर कार्यालयाकडून आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या, मानवी आरोग्यास अपायकारक व मुखाच्या कर्करोगास निमंत्रण देणा-या गुटखा व पानमसाला यांचे सेवन नागरिकांनी करु नये तसेच जिल्ह्यातील सर्व पान टपरी, हॉटेल, किराणा इत्यादी अन्न व्यावसायिकांना आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटखा व पानमसाला यांचे उत्पादन, साठवणुक, वितरण व विक्री करु नये. गुटखा व पानमसाला उत्पादन, साठवणुक, वितरण व विक्री करणा-या अन्न व्यावसायिकावर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत कार्यवाही घेण्यात येईल.