सोलापूर -: जेष्ठ नागरिकांच्या अडचणी व गरजा यांची समाजाला जाणीव करुन देण्यासाठी प्रतिवर्षी दि. 1 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून दि. 1 ऑक्टोबर रोजी भारत सरकारचे सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयामार्फत देशातील 10 विविध क्षेत्रातील जेष्ठ नागरिकांना वयोश्रेष्ठ सन्मान देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
त्यामुळे सोलापूर शहरातील शिक्षण, सामाजिक कल्याण, वयोवृध्दांसाठी कामकाज, क्रिडाक्षेत्र, साहित्य, रंगमंच, शौर्य अशा विविध क्षेत्रातील 70 वय वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तिंनी विहित नमुन्यातील प्रस्ताव (इंग्रजी व हिंदीमध्ये) सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सातरस्ता, सोलापूर या कार्यालयाकडे दि. 21 मे 2013 पर्यंत सादर करावे आवाहन दिपक घाटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर हे करीत आहेत.