बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: विरशैव धर्माचे संस्थापक बसवेश्वर नसून त्यांच्या पूर्वी अनेक युगांपासून हा धर्म अस्तित्वात होता. जातवेदमुनींच्याकडे जाऊन बसवेश्वराने शिवदिक्षा घेतली व त्यांच्या तत्त्वांचे आचरण करीत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. समाजात असलेल्या अठरा पगड जातींना सातत्याने चुकीची माहिती सांगून काहीजण समाजात दुही निर्माण करत असल्याने सर्व वीरशैवांनी आपल्या मुलांमध्ये चांगल्या संस्काराचे बीजारोपण करणे गरजेचे आहे, असे ष.ब्र. 108 श्री गुरु परंडकर महाराज यांनी व्यक्त केले.
वैरागकर मठ येथील वीरशैव समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळक, पंढरपूर येथील माजी नगराध्यक्ष नंदकुमार डोंबे, आर्म फोर्स ट्रॅब्युलचे रजिस्ट्रार ए.एस. स्वामी, अँड. प्रशांत शेटे, नागजी नान्नजकर, सातार येथील कल्पनाताई कोरे, सांगली येथील मारुती चौगुले, कार्यक्रमाचे संयोजक जगन्नाथ मठपती-स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी भाऊसाहेब आंधळकर बोलताना म्हणाले की, जगन्नाथ मठपती यांनी अनेक अडचणींवर मात करत समाजासाठी झटत असल्याचे सांगत त्या मानाने बार्शीतील समाजबांधवांची उपस्थिती ही दुर्भाग्यपणे असल्याचे म्हटले. अनेक पोटजातींमध्ये समाज विखुरला असून धर्मगुरुंनी समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. समाजाचे नेतृत्व करणारे अशा कार्यक्रमात येण्यासाठी लाजत असून आपल्याला इतर समाजाची मते मिळणार नाही, म्हणून घाबरत आहेत. मताचा जोगावा मागून या समाजाच्या जीवावर निवडून आल्यावर दारु पिऊन याच समाजाला शिव्या देताना दिसत आहेत. दिवाळीमध्ये माझ्या मुलाच्या लग्नाबरोबर समाजाच्या अनेकांचे तसेच इतरही समाजाचया मुला-मुलींचे लग्न एकत्रितपणे लावण्याचा मानस असून समाजाच्या कामासाठी अखिल भारतीय बसव सेनेची स्थापना करण्यात येणार आहे. अने मठांची, स्मशानभूमीची, समाजाच्या बोर्डिंगची अवस्था ही दयनीय झाली आहे. स्मशानभूमीचे सुशोभिकरण करण्यासाठी आपण मदत करण्यास तयार असताना काहीनी राजकारण करुन समाजातील लोकांना परावृत्त केल्याचे त्यांनी सांगितले.
बोलताना अँड. प्रशांत म्हणाले, राज्यातील वीरशैव समाजाची संख्या चांगली असून संघटनेच्या माध्यमातून एकत्रितकरण होत नाही. अनेक पालक वधू-वरांच्या शोधासाठी फार दूरहून येतात. लग्न ठरविताना गडबड झाल्याने काहीजणांची अडचण होते. जोडीदार निवडताना कोणत्या गोष्टी पाहणे गरजेचे आहे, अनावश्यक खर्च कसा टाळता येईल, तडजोड कुठे करावी, वधूच्या कोणत्या अपेक्षा असतात, वरांच्या व नातेवाईकांच्या कोणत्या असतात, या पूर्णपणे समजावून घेत नाहीत तोपर्यंत विवाह यशस्वी होत नाही. अनेकांचे शुल्लक कारणावरुन वाद होतात व विवाहबंधने तुटण्याच्या मार्गावर येतात. अनेकजण चुकीची माहिती सांगून फसवणूक केल्याचे समोर येते. किरकोळ आजार लपवून लग्न होतात, अशा प्रकारे अनेक समस्यांमुळे विवाहनंतर वाद निर्माण होतात व संसारातील अडचणी समोर येतात. भाऊसाहेब आंधळकर यांनी आपल्या नोकरीच्या कारकिर्दीत अशा अडचणीत सापडलेल्या 250 कुटुंबाच्या मुलींना आपल्या कुटुंबातील सदस्याप्रामणे समजावून सांगत त्यांना नांदायला पाठवले.
नंदकुमार डोंबे बोलताना म्हणाले, समाजाची संख्या व उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मेळावा हा कोणा एकाच्या फायद्यासाठी नसून समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी घेण्यात आल्याचे म्हटले. सध्याची अवस्था पाहून समाज आजही मागासलेला आहे. मोठ्या शहरात गरीब श्रीमंत एकत्रितपणे मेळाव्यात उपस्थित राहतात. आजचया धक्काधक्कीच्या जीवनात बहुसंख्येने वधू-वर उपस्थित राहणे गरजेचे आहे. मेळाव्यात हजर असलेल्या मुलामुलींना पाहिल्यास अनेकजण एकाच वेळी निरीक्षण करतात व त्यांची चर्चा आपोआपच दूरपर्यंत होते. त्यांच्या हजर राहण्याने उद्देश सफल होतो. समाजासाठी काम करणारांचा उत्साह वाढविणे गरजेचे आहे.
सांगोला येथील सुरेश पाटील यांनी वधू-वरांच्या मोफत नोंदणीसाठी त्यांनी काढलेल्या लिंगायत बसव डॉट काम (lingayatbasav.com) या वेबसाईटची माहिती सांगितली. सदरच्या वेबसाईटवर आपली माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिरोमणी मन्मथ स्वामी आणि महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमेश्वर घाणेगावकर यांनी केले तर आभार मठपती यांनी मानले.